Friday, 15 January 2010

महगाई आठ दिवसात कमी करतो की नाही बघा,,,,,,,


||नथू रामाय नमः ||
समस्त तमाम महाराष्ट्रातील लोकना पडलेला प्रश्न ,
टिव्ही वाल्याना पडलेला प्रश्न ,
पेपर वाल्याना पडलेला प्रश्न ,
भाजपा ,
मार्क्सवादी याना पडलेला प्रश्न 
सार्या सार्या 
साहेब विरोधकाना पडलेला प्रश्न ,
की साहेब महगाई कमी कशी कधी होणार?
आणि त्यानी दिलेल उत्तर ऐकून सारे विरोधी उलटे पालटे झाले होते .त्याना परत आज साहेबानी "महगाई आठ दिवसात कमी करतो  की नाही बघा असे सांगितले आहें त्यावर सारी 
"नतद्रष्ट"मंडळी म्हणाली कशी ते सांगा ?
ऐकिकडे भाजपा संसदेला घेराव घालायच्या गोष्टी करत आहें ,
पण पवारंचे उपाय जालिम 
त्यानी लगेच महागाई उतरणार कधी त्यापेक्षा तिच्याशी जुळवून  कसे घ्यायचे वर्गच सुरु केले,
उदा.
अन्न धान्या पासून दारु कशी बनवावी 
त्याचे फायदे काय?
त्यातून गरीब (गरीबी नव्हे) कसा कमी होइल,
 क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहें त्याची मदत घेतील 
सचीन  धोनी च्या मदतीने  एका बादलीत आंघोळ कशी करावी याचे
प्रात्यक्षिक दाखवतील,
शोवर  ऐवजी बादलित आंघोळ करने कसे बरोबर याचे 
सचिन च्या मदतींने आदर्शवत धड़े टिव्ही वरून प्रसारित केले जातील
साखर काही कमी खावी त्याने डायबिटीस कसा कमी होतो,
तसेच भाज्या  अन्न धन्य जेवानातुन कसे वगालावे ,याची ही जाहिरात 
आठवड्यात एकच दिवस भाजीचे फायदे काय याची जाहिरात 
अन्न धान्य सचिन कसा खातच नाही याची जाहिरात 
कृषि मंत्रालया तर्फे पवार साहेब करतील.
आणि शेतमालाच्या कीमती व महगाई वर चुटकी सरशी
उत्तर सापडेल घेराव,धरने ,सभात्याग ,सत्यागृह ,असल्या जुनाट कल्पनान्वर अड़कुन पडलेल्या 
लोकाना साहेबांची महानता ऐव्हडयात कळनार नाही.
तेव्हा महागाईशी कसे जुळवून घ्यावे यावर उपाय नक्कीच शोधतील 
पवार साहेब??????
बोला जिन्दा-बाद दद द द द द  ,जिन्दा-बाद द द द द
पवार साहेब
जिन्दा बाद द द द द,,,,,,,

 

No comments: