Sunday, 24 January 2010

नटरंग ...............

नटरंग ...............
अतुलजी,सप्रेम नमस्कार,
आपला नटरंग पहिला,,,
आणि "पिंजरा नंतर अंगावर आलेला सिनेमा म्हणजे नटरंग "
अस एका वाक्यात बोलू शकतो पण मग तुम्ही साकारलेल्या
नटरंगावर,नटेश्वरावर,गणा पैल्वानावर,गणा कागलकरावर,फालक्यावर, आणि ,,
ब्रुहन्नडावर,
किशोर कदमच्या म्यानेजरवर,
गुरु ठाकुर वर,
गणाच्या सर्व सवंगडयानवर, 
आणि ,,
अप्सरा आली वर जिच्या शिवाय फडच उभा राहू शकत नव्हता.
आणि सिनेमातला गणाचा होणारा बदल 
"गणा पैलवान आक्षी ५\१० मिनिटात गणा कागलकर"
यावर बोलाव तितक कमी या पाच मिनिटाच्या बदलासाठी
तुम्ही काय दीव्य केल ते तुम्हालाच माहित.
अफलातुन,,,,,
आक्खा सिनेमा एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला.
वाह क्या बात है
असेच गुणवान आणि अतुलनीय कामगिरी बजावनारे
त्यासाठी मनात घेणारे कलाकार 
जर मह्राठी चित्रपट स्रुष्टिला लाभणार असतील 
आणि मनात गणा कागलकर ची जिद्द असेल तर ,,
राजकार्न्यानी कलावंतांची इजार उतरवली तरी,,,

मराठीचा झेंडा फडकतच  राहिल
यात तीळमात्र ही शंका नाही.
अभिन्दन पुन्हा त्रिवार अभिनन्दन आणि हो,,,,
दक्षिनात्यानो सावधान आमच्याकडे ही मराठीतला 
"कमल हसन" आहे
सुनील भूमकर 

No comments: