१६ अप्रैल ११९० सोमवार "नवाकाळ" मध्ये,
"दयानंद म्हस्के" यानी एक कविता लिहिली होती.
नेमकी आज ती आठवली,कारण RPI चे एक्य झाल्याचा,
दावा केला जातोय,पण...
"रामदास आठवले" निवडणुक जिंकले असते तर...?
हे ऐक्य ,,,आणि ज्यात "प्रकाश आम्बेडकर" नाहीत
ते कसले ऐक्य ?....
आठवले काहो? हेच ते आठवले.
प्यान्थर आठवाल्र,नामांतर आठवले.
हजारो मोर्चे आठवले,सम्यक क्रांति आठवले.
गर्वसे कहो हम भारतीय आठवले,दलितांची सत्ता ,जनतेची सत्ता आठवले.
ऐक्य परिषदा आठवले,रिपब्लिकन ऐक्य आठवले.
सुकाणु आठवले,जातीयवाद रोखणे आठवले
कोंग्रेस पाठिंबा आठवले,रिपब्लिकन हारने आठवले
कोंग्रेस रिपब्लिकन सरकार आठवले,मंत्री महोदय नामदार आठवले.
समाज कल्याण आठवले,रोजगार हमी आठवले
दारू बंदी आठवले,सत्कार समारंभ आठवले
हार तुर्यांचे ढीग आठवले,मानसा फुलात आठवले
सगळ्यात आगला मंत्री आठवले,सह्याद्री गेस्ट हाउस -सिद्धार्थ होस्टेल करणारे आठवले
गेटवर अडवनारे पोलिस आठवले,शेवटची लोकल आठवले
सारे सारेच आठवले..
बुर्जिपाव आठवले ,झुणका भाकर आठवले,
आम्हाला सारे सारे आठवले,,,
सांगा तुम्हीच का ते आठवले?
रिपब्लिकन पक्षाचे काय?आठवले?
असतील शिते तर जमती भूते..आठवले?
आम्बेड़करी चल्वलीचे काय.. आठवले?
परिवर्तन आघाडीचे काय.. आठवले?
दादासाहेबांच्या युतीचे काय..आठवले?
गवईन्च्या फजितिचे काय..आठवले?
भंडार्यांच्या गतीचे काय..आठवले?
तिरपूडयान्च्या स्थितीचे काय..आठवले?
फुटलेले आठवले,तुटलेले आठवले?
पळलेले आठवले,वराती आठवले?
मिरवनारे आठवले,तोंड फिरवनारे आठवले?
तिष्ठ्नारे आठवले,उष्टे खाणारे आठवले?
सत्तेचे साथी आठवले,मिलनारे भत्ते आठवले?
चालणारे गुत्ते आठवले,लढनारे चित्ते आठवले?
ज्याना मिळाले तेच पुढे पुढे धावू लागले,
उघडे नगाडे मागे मागे सरू लागले..आठवले?
कशी चालणार सत्ता... आठवले?
हो आठवले..
ना.पवार राजकारणी आठवले?
निवडनुकी नतर काय..आठवले?
फुले-आमबेडकरांच्या विचाराचे काय..आठवले?
हिरव्याची चाल आठवले,निल्याचे हाल आठवले?
करून सोवले आतून बगले आठवले?
फूटीरतेची वाटचाल आठवले?
सत्तेचे भोगते आठवले?
सत्तेचे मक्ते आठवले?
ही इतिहासाची साक्ष आठवले...
आठवले का हो आठवले?..
आठवले का हो आठवले?
----------- दयानंद म्हस्के"आठवले का हो आठवले"
आणि म्हनुनच ......
"निवडनुकी पुर्वीच आठवले-गवई ची जुम्पलींआहें
आणि ..रिपाई ची भमपक् युति तर्न्या आधीच बुडाली आहें