Tuesday, 26 January 2010

साठी राज्य घटनेची आणि पडलेले काही प्रश्न?????,,,,,,

 बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बाते अक्सर होती रहती है 
अस म्हणुन दुर्लक्ष करण्या जोग नाही म्हनुनच,,,,,

"साठी" राज्य घटनेची आणि पडलेले काही प्रश्न?????,,,,,,
२६ नोव्हेम्बर १९४९ भारताची राज्य घटना अस्तित्वात आली ..
भारतीय राज्य घटनेची शपथ घेताना म्हणे 
"आम्ही भारतीय लोक,,,
"we the people of indiya ",,,, 
 अशी शपथ घेतली होती,,,
आणि आज ही घेतो जेव्हा केव्हा २६ जानेवारी 15 august येतो.
शाळेत होतो खुप खुप आवडीने हा सण साजरा करत असू .
शर्यत लागे कुणाचा वर्ग चांगला सजवाला आहें याची,,
मुख्य पाहुणे येवून लम्बी चौड़ी भाषण बाजी करीत असत.
नकळत आम्ही त्या कालात रमत असू .
एक दिवस अचानक दहावी पास झालो आणि शाला सुटली .
शालेतली स्वप्न घेवुन रस्त्यावर आलो ,,आणि भानावर आलो ,.
भारत माझा देश आहें ची शपथ  आठवली ,,,
राज्य घटनेची आम्ही भारतीय लोक शपथ घेणारे आम्ही 
मला कुठेच दिसले नाहीत,,,,
ते रहातात कसे?
बोलतात कसे?
कपडे लत्ते कसे घालतात?
त्यांच्या चालीरीती कुठल्या?
त्यांची जात कुठली?
धर्म कुठला?
काहीच समजले नाही हो पण मला काही लोक भेटले,,,
ते,,
गुजराती होते
मारवाड़ी होते
बंगाली होते
मुसलमान होते
दलित होते
पंजाबी होते
ख्रिश्चन होते
मराठी होते
भैये होते
बिहारी होते
असे अनेक अठरा पगड जातीचे लोक होते 
त्यांची भाष वेगली रहनिमान वेगल
जात वेगली धर्म वेगला 
पण भारतीय काही केल्या भेटला नाही ,,
बर कालांतराने हे सारे भारतीय का नाही झाले?
साठ वर्षात असे काय घडले?
की या सर्वानी आपल्या कोषात रहाणे पसंद केले?
कुणी याना जाणून बुजुन वेगल ठेवल?
या सर्वांचा अहंकार अस्मिता कुणी जोपासली?
एकमेकात सारखी भांडान होत राहतील याची व्यवस्था कुणी केली ?
आता पर्यंत ९४ वेळा घटना दुरुस्ती का करावी लागली?
विविधतेत एकतेची खोटी स्वप्न कुणी दाखवली?
असे अनेक प्रश्न आहेत जे आज मला पडत आहेत 
तुम्हालाही पडतात का?
आणि हो
तो भारतीय की काय तो तुम्हाला भेटला असेल तर मला कळवा
मी खुप आतुरतेने त्याची वाट पाहतोय,,