२६\11 च प्रश्नोप निषिद
गेले ४\५ दिवस तमाम भारतीय
आणि विशेषतः मुबैकर
ताज ,ओबेराय ,नरीमन हाउस ,व्हिटी च्या
सर्वच
शहीदाना श्रध्हांजलि वाहन्यात मशगुल आहेत
२६\11 हा खरतर कालाकुट्ट दिवस
पण आम्ही सारेच तो दिवस
साजरा करण्यात मशगुल आहोत
ज्या कुणाला कुणीही विचारत नाही
असे आमदार खासदार नगरसेवक
मंत्रीगण सिने नट सिने नट्या
सेलिब्रिटीज मारे सारे आव आणून
शहीदाना श्रध्हांजलि वाहत आहें.
तेव्हाडाच टिव्ही वर चांस चमकायला मिळेल ,
पण गेल्या वर्षभरात आम्ही केल काय?
सारी जबाबदारी सरकारवर ढकलून मोकले झालो
पुन्हा नव्या चूका करण्यासाठी
खरतर सरकारने २६\11 सारखे दिवस
राष्ट्रीयसण म्हणुन घोषित करावेत
असच वाटू लागलय
इतक्या हिडीस पध्हतिने तो समोर येतोय
खरच अशाने
शहीदाना श्रध्हांजलि मिळेल?
अवघे १२\१२ अतिरेकी ,,,,
पण ५९ तास त्यानी
मुंबई पोलिस,सैन्यदल ,नाविक दल ,फायर ब्रिगेड
या सर्वाना ५९ तास त्यानी झुंजत ठेवले.
खर तर त्याच वेळी आमच पितळ उघड पडल होत
आम्हाला आमची आणि त्यांची ताकद
कशात आहें तेच आम्हाला समजल नाही
आणि लढत राहिलो ४\५ अतिरेक्याँ बरोबर,,,,
लोक म्हणतात की ताज चा रूम भरून
त्यांच्याकडे दरुगोला होता
पण खरच याने लढता येते?
मग अस हिशोब केलाच तर आमचे
सारे पोलिस आणि सैन्यदल मिळून किती जन होते ?
त्यांच्या पेक्षा कैक जास्तच,,
आणि त्यांच्या कड़े होती फक्त दोन शस्त्र
१-धेय्य
आणि
२- त्यांच्या धर्मावर "अ ढ ळ" निष्ठा
आपल्या धेय्यावर आणि धर्मावर "अ ढ ळ"निष्ठा होती त्यांची
आणि आमची ?
मित्रानो त्यांच्या कुर्हाडीची धार आमच्या कुर्हाडीला नाही हेच खरे जो पर्यंत आम्ही मला काय त्याचे
या भूमिकेतून बाहेर येणार नाही
तो पर्यंत हे असेच सण साजरे करावे लागतील
रेल्वेच्या डब्यात एक वाक्य लिहिलेले असते ,
"सतर्कता की शुरुवात खुदसे कीजिये"
मला नाही वाटत की गेल्या वर्ष भरात काही केल आहें
आम्ही काही केलच असेल तर
एव्हडच ,,
मेंणबत्या पेटवल्या
जमेल तितक्या अतिरेक्याना शिव्या दिल्या
श्रध्हांजलि वहायचे नाटक केले
निषेध तर नेमाने करतच आहोत
आणि आमच्या दिमतीला आहेतच
टिव्ही च्यानेल्स त्यांच्या टीआरपी सह
आतापर्यंत आम्ही असेच मरत होतो
आता अतिरेक्यांच्या बन्दुकाना रोजच बळी पडू,
देशाच्या ऐकते साठी मरतोय ही भावना मनात ठेवू.
पण सावध नाही होणार.
आम्ही काहीही करणार नाही
अरे मग रोज मारणार कोण ?
आमच्या नावाने श्रध्हांजलि वाहणार कोण?
वृत्तपत्रात आमच्या बाजूने रकाने च्या रकाने
भरून लिहिणार कोण?
शहिदांच्या नावावर स्वताहाचे
आणि पक्षाचे ब्यानर झालकावनार कोण?
अरे आम्ही बलिच नाही पडलो तर
अतिरेक्याना बिरयानी तरी देणार कोण?