||श्री नथू रामाय नमः ||
त्या कोम्ब्ड्या जशा खाटकाच्या हातचे बाहुले होत्या
त्या जशा उठाव करू शक्त नव्हत्या
गप्प बसल्या मुले त्यानी जस स्वतहा चे नुकसान करून घेतले
आणि स्वताचा जिव गमावून बसल्या तसेच सारे
पद्म पुरस्काराच्या लायकीचे गप्प बसले तर ,,, खान घाण करणारच
पद्म पुरस्काराला झालय काय आमच्या पत्तूर ते आलाच न्हाय,,,,?
काल परवा पासून पेपरात वाचतुया की काय पद्म का काय ते
सरकार ते आम्हास्नी का द्यात नाही , न्हाई म्हंटल समदा घोलच संपल,,,,
त्या बावळया सैफ अली खानास देण्या पत्तूर आमी बरे न्हाई का?
अवो त्यों म्हणतो
"गेल्या काही वर्षातील पुरस्कारंच्या याद्या पहिल्या तर,
त्यातल्या प्रत्येकानेच काही "अणुबोम्ब चा शोध नाही लावला "
अवो बरुबरच हाये त्ये
तुम्हास्नी ठाव हाये का? त्या समद्या लोकानी हे काहीच न्हाई केले
आणि आमच्या सैफ रावानी दोन +दोन बोम्बशेल चा शोध लावला
हात कूट राव?
तुमला तरी जमल का अस एकदम दोन दगड़ान्वर पाय ठेवाय?
अस बायका मुलांशी नात तोडून तुम्हास्नी तरी र्हाता इल का?
अस नात तोड़न सोप्प हाय राव?
अशी नवी नाती तुम्हास्नी तरी जोडाया इल का?
बर त्ये बी जाऊ द्या काळविटाची शिकार ?
आवो त्यों तर जगातील दुर्मिल होत चाललेला प्राणी हाय,
न्हाई ना मंग मी म्हणतो कशापाई कावताया?
बर ही त्याची कामगिरी समद्यास्नी ठाव हाय आंतर राष्ट्रिय म्हणा ना ,,
आमदारा खासदारंचे उम्बरठे तुम्हास्नी झिझावत येतात का?
पुरस्कार विकत घ्याची ताकद तुमच्या @@@हाये का?
न्हाय ना?
मग मी म्हणतो कशापाई अवो कशापाई ह्यो गोंधूळ चावालेला हाये?
अवो आमस्नी ठाव हाये, ह्यो पुरस्कार मिळवावा मिळावा म्हणुन
बरेच पात्र उमेदवार
डोळ गाडून बस्ल्याती की कवा ह्यो पुरस्कार जाहिर हुतुया
आण आमला बी ह्यो मिळतूया
पण सरकार तरी काय करणार यादी बी लई म्होठी हाय नव्ह?
कुणा कुनास्नी निवडायच ? ह्ये म्हणजे "उचलली जीभ ,,,
असा हाय काय वो ?
सरकारला तेव्हाडा टैम हाय का?
इथ आम्हासी एक गोष्ट आठवातिया ,,
एका सर्व धर्म समभाव वाल्या खाटकाची ,,,,
येक़ डाव त्यानी बी ठरवल ???
की कोंबडया काहीच बोलत नाहीत आपण त्यास्नी कस बी कापतुया
आणि त्यास्नी कूट बी कुनाल बी इकतोया ,,
तवा त्यांन समद्या कोम्ड्यास्नी म्या तुमची तुमच्या
वजना परमान वर्ग वारी करणार हाये तवा,,
तुमी सांगा तुमास्नी म्या कूट पाठवू ?
कुणाला ताज ला, कुणाला ओबेराय ला,
तर कुणाला फाइव्ह स्टार हाटलात जायाच हाये
म्हंजी म्या तशी कापून तुमास्नी पाठवून दितो
पर त्यातील एक कोम्ब्डी म्हणाली आम्हाला कूट जायाच न्हाई आमला जिवंत रायाच हाये
तास त्यों खाटीक म्हणतो कसा?
त्ये न्हाई जमाच तुमास्नी मारव तर लागलच तेव्हड़ सोडून बोला
तुमि तुमच स्वातंत्र्य हरवून बसला आहात तुमच्याच गप्प बसायच्या सूरी तुमच गळ कापणार हाये
कुला ठिवायच कुणाला नै ते म्या ठरीवनार
जगायचे त्ये जगत्याल आण मारायच त्ये मरत्याल
आण जे भाग्यवंत अस्त्याल त्ये ,,,,आण मला ज्ये पटत्याल
त्ये आण त्येच पद्म पुरस्कार घिवुन जातील.
आर मुर्खानो तुमि ही बड़ बड़ करण्या पत्तूर माजी
काई चपटी ची ,, नकटी ची ,, एखाद्या लांबड़ी ची ,,
टेबला खाली भेटनार्या गांधीची तरी येवस्था कराची व्हती राव
साल येडे ते येड़ेच राहिले राव तुमि आण कशापाई
त्यों पद्म तुम्हास्नी पायजे ?
उरला सुरला त्यों विखे पाटलाला दिला की आता कावुन रागावताय?
Sunday, 31 January 2010
Subscribe to:
Posts (Atom)