Wednesday, 7 October 2009

अवो नावात काय हाय?

आ.मा श्री .संजीव पेंढारकर
विको लेब्स 
अरे सॉरी ह मी चुकून आपले नाव लिहिले
माफ करा खर तर नाव किवा पत्ता न टाकताच
हा मेल किवा पत्र मीलु शकतो हे मझ्या
ध्यानातच नाही आल 
आजच आपला लेख वाचला
सकाळ ७.१०.९ "नावात काय आहें?"
आन आमी आपले येडे आपल्या 
सारख्या मोठया ठ्या ठ्या ठ्या,,,,,,,,,
सायंबास्नी हे 
पत्तुर बिना नावा गावच मिळल ,
ह्यो इचारच आमच्या टाकूर्यात न्हाइ आला.
तवा एक डाव आम्हास्नी माफी करा 
आवो तुमचा इचार,,
त्यों न्हैका ?
"नावात काय आहें चा "
आमच्या टाकूर्यात न्हाइ शिरत 
पण तवा,,  
सकाळ पास्न आमी ठरिवलय
आता आमी बी आमच्या 
बापच नाव लिवनार न्हाइ
अवो नावात काय हाय?
आमच्या पोरा टोरास्नी बी सांगणार हाय ,
खबरदार,, 
आमच नाव तुमच्या नावा 
म्होर लिवायच न्हाइ 
अवो नावात काय हाय?
आमच्या बायकोला  सांगणार हाइ ,,
मह्या नावाच कुकू लावयाच न्हाइ ,,
अवो नावात काय हाय?
अशी ही लीश्ट सायेब लइ वाडल बगा
थोडक्यात गमत सांगतो राव ,,
बा ,संजीवा कान दिवुन ऐक,,
तुम्हास्नी पड़लेला प्रश्न,, 
ह्या महाराष्ट्रातल्या 
एका मंत्र्यास्नी बी पडला हुता 
आता बगा झाली असतील४०\५० वर्स
यसवंत राव चव्हाण की काय नु त्यां नाव हुत.
त्याना बी असाच प्रस्न पड़ला हुता ,
अवो त्यों,, 
आचार्य अत्रे की काय नाव हुत त्यांच.
त्यों बी असाच वरडायचा ,,
"बेलगाव कारवार सह सारा सीमा प्रदेश 
महाराष्ट्रात विलीन झालाच पाहिजे"
त्यावर त्यों बाबा अवो त्यों 
यशवंत राव चव्हाण त्यों म्हणला ,
"अत्रे साहेब सीमा प्रदेश,,, 
महाराष्ट्रात विलीन झाला पाहिजे" 
ह्ये बरुबर हाय 
पण झालाच पायजे ह्या "च"वर 
एव्हाडा जोर का ?
अवो तेव्ह्डा त्यों "च"काढला 
तर न्हाइ का जमणार ?
त्यावर अत्रे सायेब गरजले 
आक्षी सिव्हा वाणी 
चव्हाण सायेब  
आमी आमचा "च"माग घ्याया तयार हाय.
फकस्त एक काम करा ,,
तुमच्या नावातील "तेव्ह्डा "च"काढा
तुमाला बी "च"ची कीमत कळल 
आन "च" काढल्यावर काय उरत 
त्ये आमास्नी कळवा.
आन तुमि तर आमास्नी नावात काय 
म्हणून इचारता
आवो आमस्नी तर नावा बिगर,, 
काय बी मोठठठ,,न्है दिसत 
इथाला इतिहास तपासला तर लक्ष्यात इल 
नावा साठी तर इथ संमद्या लढाया झाल्या 
कितेकानी प्राण दिले 
कित्येकानी प्राण घेतले 
आणि हो 
आम्ही नतद्रष्ट 
छत्रपतिंचे राजेपन आम्हीच नकारल 
म्हणुन तर त्याना ,,
"मी राजा आहें हे सांगाव लागल "
राज्याला राजधानिला नाव द्याव लागल.
तेव्हा संजीव पेंढारकर नावात काय आहें 
हे निदान तुम्ही तरी बोलू नका 
इतकी वर्षे चाललेली तुमची विको तीच नाव बदला 
किवा काढून टाका बघा काय गमत होते