Sunday, 31 January 2010

पद्म पुरस्काराला झालय काय आमच्या पत्तूर ते आलाच न्हाय,,,,?

 ||श्री नथू रामाय नमः ||
त्या कोम्ब्ड्या जशा खाटकाच्या  हातचे बाहुले होत्या  
त्या जशा उठाव करू शक्त नव्हत्या
गप्प बसल्या मुले त्यानी जस स्वतहा चे नुकसान करून घेतले 
आणि स्वताचा जिव गमावून बसल्या तसेच सारे 
पद्म पुरस्काराच्या लायकीचे गप्प बसले तर ,,, खान घाण करणारच
पद्म पुरस्काराला झालय काय आमच्या पत्तूर ते आलाच न्हाय,,,,? 
काल परवा पासून पेपरात वाचतुया की काय पद्म का काय ते
सरकार ते आम्हास्नी का द्यात नाही , न्हाई म्हंटल समदा घोलच संपल,,,,
त्या बावळया सैफ अली खानास देण्या पत्तूर आमी बरे न्हाई का?
अवो त्यों म्हणतो 
"गेल्या काही वर्षातील पुरस्कारंच्या याद्या पहिल्या तर,
त्यातल्या प्रत्येकानेच काही "अणुबोम्ब चा शोध नाही लावला " 
अवो बरुबरच हाये त्ये
तुम्हास्नी ठाव हाये का? त्या समद्या लोकानी हे काहीच न्हाई केले
आणि आमच्या सैफ रावानी दोन +दोन बोम्बशेल चा शोध लावला 
हात कूट राव?
तुमला तरी जमल का अस एकदम दोन दगड़ान्वर पाय ठेवाय?
अस बायका मुलांशी नात तोडून तुम्हास्नी तरी र्हाता इल का?
अस नात तोड़न सोप्प हाय राव?
अशी नवी नाती तुम्हास्नी तरी जोडाया इल का?
बर त्ये बी जाऊ द्या काळविटाची शिकार ?
आवो त्यों तर जगातील दुर्मिल होत चाललेला प्राणी हाय,
न्हाई ना मंग मी म्हणतो कशापाई कावताया?
बर ही त्याची कामगिरी समद्यास्नी ठाव हाय आंतर राष्ट्रिय म्हणा ना ,,
आमदारा खासदारंचे उम्बरठे तुम्हास्नी झिझावत येतात का?
पुरस्कार विकत घ्याची ताकद तुमच्या @@@हाये का?     
न्हाय ना? 
मग मी म्हणतो कशापाई अवो कशापाई ह्यो गोंधूळ चावालेला हाये?
अवो आमस्नी ठाव हाये, ह्यो पुरस्कार मिळवावा मिळावा म्हणुन 
बरेच पात्र उमेदवार
डोळ गाडून बस्ल्याती की कवा ह्यो पुरस्कार जाहिर हुतुया 
आण आमला बी ह्यो मिळतूया
पण सरकार तरी काय करणार यादी बी लई म्होठी हाय नव्ह?
कुणा कुनास्नी निवडायच ? ह्ये म्हणजे "उचलली जीभ  ,,,
असा हाय काय वो ?
सरकारला तेव्हाडा  टैम हाय का?
इथ आम्हासी एक गोष्ट आठवातिया ,,
एका सर्व धर्म समभाव वाल्या खाटकाची ,,,,
येक़ डाव त्यानी बी ठरवल ???
की कोंबडया काहीच बोलत नाहीत आपण त्यास्नी कस बी कापतुया
आणि त्यास्नी कूट बी कुनाल बी इकतोया ,,
तवा त्यांन समद्या कोम्ड्यास्नी म्या तुमची तुमच्या
वजना परमान वर्ग वारी करणार हाये तवा,, 
तुमी सांगा तुमास्नी म्या कूट पाठवू ?
कुणाला ताज ला, कुणाला ओबेराय ला,
तर कुणाला फाइव्ह स्टार हाटलात जायाच हाये
म्हंजी म्या तशी कापून तुमास्नी पाठवून दितो
पर त्यातील एक कोम्ब्डी म्हणाली आम्हाला कूट जायाच न्हाई आमला जिवंत रायाच हाये
तास त्यों खाटीक म्हणतो कसा?
त्ये न्हाई जमाच तुमास्नी मारव तर लागलच तेव्हड़ सोडून बोला
तुमि तुमच स्वातंत्र्य हरवून बसला आहात तुमच्याच गप्प बसायच्या सूरी तुमच गळ कापणार हाये
कुला ठिवायच कुणाला नै  ते म्या ठरीवनार
जगायचे त्ये जगत्याल आण मारायच त्ये मरत्याल
आण जे भाग्यवंत अस्त्याल त्ये ,,,,आण मला ज्ये पटत्याल
त्ये आण त्येच पद्म पुरस्कार घिवुन जातील.
आर मुर्खानो तुमि ही बड़ बड़ करण्या पत्तूर माजी
काई चपटी ची ,, नकटी ची ,, एखाद्या लांबड़ी ची ,,
टेबला खाली भेटनार्या  गांधीची तरी येवस्था कराची व्हती राव
साल येडे ते येड़ेच राहिले राव तुमि आण कशापाई
त्यों पद्म तुम्हास्नी पायजे ?
उरला सुरला त्यों विखे पाटलाला दिला की आता कावुन रागावताय?

 

Tuesday, 26 January 2010

साठी राज्य घटनेची आणि पडलेले काही प्रश्न?????,,,,,,

 बड़े बड़े शहरों में ऐसी छोटी छोटी बाते अक्सर होती रहती है 
अस म्हणुन दुर्लक्ष करण्या जोग नाही म्हनुनच,,,,,

"साठी" राज्य घटनेची आणि पडलेले काही प्रश्न?????,,,,,,
२६ नोव्हेम्बर १९४९ भारताची राज्य घटना अस्तित्वात आली ..
भारतीय राज्य घटनेची शपथ घेताना म्हणे 
"आम्ही भारतीय लोक,,,
"we the people of indiya ",,,, 
 अशी शपथ घेतली होती,,,
आणि आज ही घेतो जेव्हा केव्हा २६ जानेवारी 15 august येतो.
शाळेत होतो खुप खुप आवडीने हा सण साजरा करत असू .
शर्यत लागे कुणाचा वर्ग चांगला सजवाला आहें याची,,
मुख्य पाहुणे येवून लम्बी चौड़ी भाषण बाजी करीत असत.
नकळत आम्ही त्या कालात रमत असू .
एक दिवस अचानक दहावी पास झालो आणि शाला सुटली .
शालेतली स्वप्न घेवुन रस्त्यावर आलो ,,आणि भानावर आलो ,.
भारत माझा देश आहें ची शपथ  आठवली ,,,
राज्य घटनेची आम्ही भारतीय लोक शपथ घेणारे आम्ही 
मला कुठेच दिसले नाहीत,,,,
ते रहातात कसे?
बोलतात कसे?
कपडे लत्ते कसे घालतात?
त्यांच्या चालीरीती कुठल्या?
त्यांची जात कुठली?
धर्म कुठला?
काहीच समजले नाही हो पण मला काही लोक भेटले,,,
ते,,
गुजराती होते
मारवाड़ी होते
बंगाली होते
मुसलमान होते
दलित होते
पंजाबी होते
ख्रिश्चन होते
मराठी होते
भैये होते
बिहारी होते
असे अनेक अठरा पगड जातीचे लोक होते 
त्यांची भाष वेगली रहनिमान वेगल
जात वेगली धर्म वेगला 
पण भारतीय काही केल्या भेटला नाही ,,
बर कालांतराने हे सारे भारतीय का नाही झाले?
साठ वर्षात असे काय घडले?
की या सर्वानी आपल्या कोषात रहाणे पसंद केले?
कुणी याना जाणून बुजुन वेगल ठेवल?
या सर्वांचा अहंकार अस्मिता कुणी जोपासली?
एकमेकात सारखी भांडान होत राहतील याची व्यवस्था कुणी केली ?
आता पर्यंत ९४ वेळा घटना दुरुस्ती का करावी लागली?
विविधतेत एकतेची खोटी स्वप्न कुणी दाखवली?
असे अनेक प्रश्न आहेत जे आज मला पडत आहेत 
तुम्हालाही पडतात का?
आणि हो
तो भारतीय की काय तो तुम्हाला भेटला असेल तर मला कळवा
मी खुप आतुरतेने त्याची वाट पाहतोय,,                                                                                                                                                                                                                                                                                             



Sunday, 24 January 2010

महाराज तुम्ही चुकलात....

महाराज तुम्ही चुकलात....
डॉ,अमोल कोल्हे (प्रति शिवाजी )
मानाचा मुजरा, सादर प्रणाम,
माफी असावी महाराज पण आज आपण चुकलात ?
आजकल आपले रोज "गुड मोर्निग "लेख वाचतो आणि 
सकाळ  चांगली अनुभवतो,,
पण आज आपण चुकलात असे वाटले म्हनुनच,,
असो,
डॉ,नाण्याची दूसरी बाजु मांडताना सरसकट आज सगालीच मूल आत्महत्या करत आहेत असा आपण 
सुर लावालत,
जिथे आपणच म्हणता १५\२० % टक्के चित्र पाहून मुलांना कसे काय नैराश्य येते?
महाराज,
"ग्लास अर्धा रिकामा आहें की अर्धा भरला आहें" हे समजायला आयुष्य जाव लागत .
मनाची कवाड तितकीच उघडी ठेवावी लागतात 
तेव्ह्ड़ी  समाज येण्यास काळ लोटावा लागतो,
 त्याना आपल्या चिंतातुर पालकांच्या चेहर्यावरचे हास्य फुलवता आले असते 
तर त्यानी आत्महत्या  केली असती का? 
ज्या मुलांकडे लढन्या झगड़न्याची ती मूल कशाला आत्महत्या करतील?
किंवा असा विचार तरी का करतील?
आणि त्यातही पालकाना वाटत असेल की त्यांच्या चिंतातुर चेहर्याला 
फुलवाव तर त्यानी त्या मुलाची आधी ताकद आणि क्षमता ओळखली  पाहिजे.
हे सगळ तो पेलू शकतो का? की केवळ मला हे जमल नाही म्हणून त्याने कराव का?
हा विचार चुकीचा नाही का?
अपेक्षांच्या बेटावर रहनार्याना काय कळनार की पाणी हे जीवन आहें 
तो त्या पाण्याचा वापर जिव देण्यासाठी च करणार ,,,
आणि त्यामुलेच नकळत पने पालकानीच लावलेल्या टक्क्यांच्या 
rat res मध्ये मुलगा हरला की आत्महत्येचा दोरला तो जवळ करतो.
परवाच मझ्या मुलाच्या स्नेह  समेलनाला हजर होतो त्यात शालेच्या मुलानी 
एक नाटूकली सादर केली खुप छान होती नाटूकली 
"सहा मार्क्स"असे नाव होते 
त्यात ही हाच विषय शालेतील अत्यंत हुशार विद्यार्थ्याला ,जेव्हा प्रतिस्पर्धी निर्माण होतो 
आणि तो सहा मार्क्स कमी मिळवल्यावर  त्याची काय घाल मेल होते
अगदी की त्या दूसर्या मुलाला तो विद्यार्थी विनवतो की, 
तु शालेतुंन  नाव काढ त्याशिवाय 
मी पुढे येवू शकत नाही आणि तु जर नाव नाही काढलस  तर,,
एक तर मी जिव देइन
किंवा मी तुझ जिव घेइन ,,,,
मग तो दूसरा मुलगा त्या हिरोच्या आई कड़े जातो तिला समजावतो ती समजते आणि 
शेवट गोड होतो,,,
आणि म्हनुनच डोक्यावरच ओझ पायाखाली दाबुन वर फक्त तेच बघतात
ज्यांच्यात धमक असते सगळ्यानाच हे जमेल ही अपेक्षा ठेवणे  चुकिचे.
अणि हो या सर्व गडबडित ,
ही नाटूकली प्रत्यक्ष जेव्हा प्रेक्षा गृहात चालू होती 
आणि तो डोळ्यात पानी आननारा प्रसंग जेव्हा तो मुलगा (हीरो)
दुसर्या मुलाला म्हणतो की तु तुझ नाव शालेतुन काढ नाही तर मी 
तुझ जिव तरी घेइन किंवा मी जी देइन ,,,
त्यावर इतर विद्यार्थी जे नाटक पाहत होते 
ते सारेच विद्यार्थी आणि पालक ही 
ह्या करुण प्रसंगावर हसत होते 
जे शिक्षण कुठे हसाव कुठे रडाव ते सांगू शकत नसेल तर,,?
किमान सुशिक्षित तरी,,,?बनवाव 
ही कमाल अपेक्षा त्यापेक्षा ठेवण हे जास्त योग्य होइल मग

त्या शिक्षनाच्या आयच्या नावान कुणीही बोम्ब मारणार नाही .   
म्हणु म्हंटल महाराज  थोड चुकलात ,,,



नटरंग ...............

नटरंग ...............
अतुलजी,सप्रेम नमस्कार,
आपला नटरंग पहिला,,,
आणि "पिंजरा नंतर अंगावर आलेला सिनेमा म्हणजे नटरंग "
अस एका वाक्यात बोलू शकतो पण मग तुम्ही साकारलेल्या
नटरंगावर,नटेश्वरावर,गणा पैल्वानावर,गणा कागलकरावर,फालक्यावर, आणि ,,
ब्रुहन्नडावर,
किशोर कदमच्या म्यानेजरवर,
गुरु ठाकुर वर,
गणाच्या सर्व सवंगडयानवर, 
आणि ,,
अप्सरा आली वर जिच्या शिवाय फडच उभा राहू शकत नव्हता.
आणि सिनेमातला गणाचा होणारा बदल 
"गणा पैलवान आक्षी ५\१० मिनिटात गणा कागलकर"
यावर बोलाव तितक कमी या पाच मिनिटाच्या बदलासाठी
तुम्ही काय दीव्य केल ते तुम्हालाच माहित.
अफलातुन,,,,,
आक्खा सिनेमा एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला.
वाह क्या बात है
असेच गुणवान आणि अतुलनीय कामगिरी बजावनारे
त्यासाठी मनात घेणारे कलाकार 
जर मह्राठी चित्रपट स्रुष्टिला लाभणार असतील 
आणि मनात गणा कागलकर ची जिद्द असेल तर ,,
राजकार्न्यानी कलावंतांची इजार उतरवली तरी,,,

मराठीचा झेंडा फडकतच  राहिल
यात तीळमात्र ही शंका नाही.
अभिन्दन पुन्हा त्रिवार अभिनन्दन आणि हो,,,,
दक्षिनात्यानो सावधान आमच्याकडे ही मराठीतला 
"कमल हसन" आहे
सुनील भूमकर 

Friday, 15 January 2010

महगाई आठ दिवसात कमी करतो की नाही बघा,,,,,,,


||नथू रामाय नमः ||
समस्त तमाम महाराष्ट्रातील लोकना पडलेला प्रश्न ,
टिव्ही वाल्याना पडलेला प्रश्न ,
पेपर वाल्याना पडलेला प्रश्न ,
भाजपा ,
मार्क्सवादी याना पडलेला प्रश्न 
सार्या सार्या 
साहेब विरोधकाना पडलेला प्रश्न ,
की साहेब महगाई कमी कशी कधी होणार?
आणि त्यानी दिलेल उत्तर ऐकून सारे विरोधी उलटे पालटे झाले होते .त्याना परत आज साहेबानी "महगाई आठ दिवसात कमी करतो  की नाही बघा असे सांगितले आहें त्यावर सारी 
"नतद्रष्ट"मंडळी म्हणाली कशी ते सांगा ?
ऐकिकडे भाजपा संसदेला घेराव घालायच्या गोष्टी करत आहें ,
पण पवारंचे उपाय जालिम 
त्यानी लगेच महागाई उतरणार कधी त्यापेक्षा तिच्याशी जुळवून  कसे घ्यायचे वर्गच सुरु केले,
उदा.
अन्न धान्या पासून दारु कशी बनवावी 
त्याचे फायदे काय?
त्यातून गरीब (गरीबी नव्हे) कसा कमी होइल,
 क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहें त्याची मदत घेतील 
सचीन  धोनी च्या मदतीने  एका बादलीत आंघोळ कशी करावी याचे
प्रात्यक्षिक दाखवतील,
शोवर  ऐवजी बादलित आंघोळ करने कसे बरोबर याचे 
सचिन च्या मदतींने आदर्शवत धड़े टिव्ही वरून प्रसारित केले जातील
साखर काही कमी खावी त्याने डायबिटीस कसा कमी होतो,
तसेच भाज्या  अन्न धन्य जेवानातुन कसे वगालावे ,याची ही जाहिरात 
आठवड्यात एकच दिवस भाजीचे फायदे काय याची जाहिरात 
अन्न धान्य सचिन कसा खातच नाही याची जाहिरात 
कृषि मंत्रालया तर्फे पवार साहेब करतील.
आणि शेतमालाच्या कीमती व महगाई वर चुटकी सरशी
उत्तर सापडेल घेराव,धरने ,सभात्याग ,सत्यागृह ,असल्या जुनाट कल्पनान्वर अड़कुन पडलेल्या 
लोकाना साहेबांची महानता ऐव्हडयात कळनार नाही.
तेव्हा महागाईशी कसे जुळवून घ्यावे यावर उपाय नक्कीच शोधतील 
पवार साहेब??????
बोला जिन्दा-बाद दद द द द द  ,जिन्दा-बाद द द द द
पवार साहेब
जिन्दा बाद द द द द,,,,,,,

 

मी ज्योतिषी शीईईईईईईई ,,,,,,,,

||श्री नथू रामाय नमः || 
मी ज्योतिषी शीईईईईईईई 
पवार साहेबाना आणखी कुठल्या कुठल्या पदव्या मिळणार आहेत देव जाणे,,,,
हा प्रत्येक गोष्टीत ते
"नरो व कुंजरावो"  
ची भूमिका मात्र जरूर घेतात.
काल परवा सुद्धा ते म्हणाले की बाबा मी काही जोतिषी नाही ,,,
पण महाराष्ट्रातील लोक ऐकतिल तर ना ?
त्यांच्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा ते कधी कधी खुद्द प्रतिभा ताईना देखिल कळत नाही अशी वंदता आहें त्या बाबत ची खात्रीलायक गोष्ट अशी की,,,
"एक दिवस शरद पवार साहेब घरात कुठल्याशा फायली चाळत बसले होते ,अचानक त्यांचे तळ पाय आणि आजुबाजुला खाज  सुटली त्यानी पायाकडे पाहिले आणि ते ओरडले  ,
"अग प्रतिभा माझ्या पायाला मुंग्या आल्या !" 
प्रतिभा ताई ~ अहो केव्हाचे एकाच जागी बसून आहात .
उठा जरा मुंग्या नाही येणार तर काय येणार?
पवार~"अग खरो खरीच्या  मुंग्या आल्या आहेत !".
प्रतिभा ताई~"अहो नीदान  माझ्याशी तरी खर बोलत जा 
उठा जरा उठा मी चहा  टाकते.
तर असे आपले पवार साहेब ,
परवा ते म्हणाले मी काही ज्योतिषी नाही,,
खर नाही तर काय पवारां सारखा दूरदृष्टि ?असलेला कृषि मंत्री या देशाला मिळाला हे खरतर या देशाच भाग्य ,,????
पण आम्ही कपाळ करंटे साहेबंच महत्त्व जाणत नाही.
बर बोलेले साहेब मी ज्योतिषी नाही यात चुक ते काय?
साहेब नाहीतच ज्योतिषी,,,
अहो नाहीतर ,,
त्यानी आपलेच राजकीय भवितव्य घडवले नसते का?
नीदान ४ दशकानच्या  या वाटचालित त्यानी आपलेच राजकीय भविष्य बिघडवले असते का?
मग अशा माणसाला बाजारातील 
महगाई ,शेतमाल,साखरेच्या कीमती ,कधी कमी होणार हे विचारण्यात काय हशील आहें?
"शेती परवडत नसेल तर शेतकर्याने  शेतीच करू नये " असा सल्ला मंत्री झाल्या झाल्या साहेबानी दिला होता.
त्याकडे त्यावेळी दुर्लश केल . आणि आज कुठल्या तोंडाने विचारतात 
महागाई कधी कमी होणार?
साहेबांना शेतीतल काय कळत ?
त्याना शेत म्हणजे जमीन आणि जमीन म्हणजे भूखंड ऐव्हडच  माहित ,,,
खर तर दोष द्याय्चाच असेल तर तो डॉ.मनमोहन सिंग याना द्यावा ,पवाराना कृषी मंत्री करणे  ही त्यांचीच  चुक,,
तेव्हा मित्रानो 
साहेबाना दोष देण्या ऐवजी त्यांचा जयजयकार करा बोला 
अरे जिन्दा -बाद द द द द द जिन्दा -बाद द द द द 
पवार साहेब जिन्दा -बाद द द द द द द द द द द द द द द   


   

Thursday, 14 January 2010

ओझ अपेक्षांच

ओझ अपेक्षांच
तस हे लिहिता लिहिता जरा उशीरच झाला ,
पण हरकत नाही
उंटाच्या पाठी वरची शेवटी काडी  ठरन्या आधी ,,
नाटकाची तीसरी घंटा होंन्या आधी,,,,
जागे होणे महत्वाचे म्हनुनच ,,,,हा पत्र प्रपंच ,,
लिहू लिहू म्हणता उशीर झाला कारण, 
माझा शंतनु,,  माझा मुलगा ,,
अभ्यासात तसा हुशार नाही परन्तु तो   ढ  ही नाही ,,,
पण तरी देखिल इतर आई वडील यांच्या सारखे माझ्या परीने अरे
अभ्यास कार चा धोशा लावलेला असतो आणि माझी बायको त्याला हात भार लावत असते ,पण तरीही आज तो १३\१४ वर्षाचा झाला पण शाळेत जावून ही
तो जास्त खुश कधी दिसला नाही ,,
पण ,
गेल्या ६\७ तारखे पासून तो खुश दिसत होता .
एकीकडे मुलांच्या आत्महत्या आणि माझा मुलगा खूष विचित्र नाही वाटत?
पण त्याच्या खुशिच कारण वेगलाच होत त्याच्या शाळेत वार्षिक 
स्नेह समेलन होत त्याची तयारी सुरु झाली होती.
तो करणार होता ,,
शिवाजी..... अफजल खानचा वध करणारा शिवाजी,,,,
त्याची तयारी चालली होती,
तहान भूक विसरून त्यात तो समरस झाला होता , 
आज काय तलवार बनव ,कपड्यांची चवौकशी  कर,
कुठे मिळतात  ते बघ ,या मित्राला भेट त्या मित्राला भेट ,
घरी देखिल सीडी लावून तालीम कर ,,
त्याच आवेशात संवाद म्हन खुप खुप आवडीने तो हे सार करत होता ,
ना थकता ना कंटाळता ही आज पहिली वेळ होती ज्यासाठी आम्हाला त्याला जबरदस्ती करावी लागत नव्हती ,,
आणि नकळतच मी विचार करू लागलो की हे 
 थ्री इडीयट्स नेमके कोण? 
सारे पालक,, शाळा ,,टिव्ही शो च्या नावाखाली मुलांच बालपन हिरवनारे हिरवुन घेणारे   हेच सारे या आज होणार्या आत्म्हात्येला जबाबदार आहेत.
सगळ्याच  पालकाना   आपल्या मुलाने "सचिन" व्हावे वाटते,
पीटी उषा बना
सानिया मिर्झा बना  

टिव्ही सिनेमात चमकावे वाटते ,
गेम शो मध्ये भाग घेवुन पैसा कमवावे वाटते,
अभ्यासात पहिला नंबर यावे वाटते ,
नव्हे कमीत कमी ९५\९६% टक्के मार्क मिळवावे वाटते ,
अपेक्षा असणे ,,जिंकायची इच्छा मनात धरणे हेही ठीक पण,,,,
याच यशा पाठोपाठ अपयश ही येत असते ते पचवायाचे  असते हे ही त्याला शिकवणे जास्त गरजेचे आहें असे नाही वाटत आपल्याला ?
केवळ आम्हाला नाही जमल म्हणून तुम्ही हे करा ,,,
बस,,,काहीही करा पण जिंकत जा ,,
मित्रानो सर्वात वाइट नशा कुठली असेल तर ती जिंकायची ...
टिव्ही वर एक जाहिरात लागते 
"डर के आगे जित है "पण वरील थ्री इडीयट्स मुले आज,,
"डर के आगे मौत है "असच म्हणायची पाली आली आहें.
अपेक्षांच ओझ सहन करायची  ताकद नसणारे विद्यार्थी आत्महत्या 
करण्यास प्रवृत्त होत आहेत याचा गंभीर्याने विचार केला पाहिजे .
ऐपत  नसताना पात्रता नसताना आज त्यांच्या पाठीवर 
मना मनाच (मनावरही) ओझ लादल जातय.ज्या वयात खर तर त्यानी 
मनसोक्त खेळल बागडल पाहिजे त्या वयात ,,
तो ससा जसा आभाळ फाटल म्हणत कावरा बावरा होत धावतो 
आपण सारेच तसेच धावत अहोत असे नाही वाटत?
तसेच आज सारे शिक्षनाच्या मागे धावत आहेत.
असे नाही की शिक्षण महत्वाचे नाही 
पण शर्यत का? ९८% टक्केच का? 
डोक्टरच का? इंजीनियरच?
एमबीए च का?
डोक्टरला सायकलचे पंक्चर काढता येणार आहें का?
सुन्दर असे चित्र काढता येणार आहें का?
छान पैकी गाता येणार आहें का?

चप्पल शिवता येणार आहें का?
प्रत्येक जन आपापल्या जागेवर हुशार च असतो पण आम्ही,,,?
हा, याला ९८% टक्के आहेत म्हणजे तो हुशार सर्टिफिकेट देऊन मोकले. 

त्या गळ फास लावानार्य मुलात आपल्या मुलाच नाव येवू नए असे वाटत 
असेल तर त्यांच्यावर तुमच्या अपेक्षांचा बोजा टाकू नका मुलांची आणि तुमची ही कुवत ओळखा  आज हे सार लिहायच कारण ,,
मला देखिल शाळेत जावकर बाई होत्या इतिहास शिकवायला 
पाठ केल्या प्रमाने बाईनी आम्हाला धडा कधी शिकवलाच नाही 
त्या प्रत्यक्ष आम्हाला छत्रपति मुसलमानंशी,औरनग्जेबाशी लढतायत
असे चित्र आमच्या डोळ्या समोर उभे करत असत  

तलवारिंचा प्रत्यक्ष खंखनाट  ऐकतोय की काय असे वाटे. आणि म्हनुनच 
आम्ही इतिहास शिकलो नाही जगलो निदान तसा प्रयत्न तरी नक्कीच करत आहोत अत्यंत प्रामाणिक पने,,,,,,
म्हनुनच मुलाना आवडेल अशा पद्धतीने शिकवले तर खरच  आपण सारे 
सुशिक्षित होऊ, असे वाटते .  

आणि म्हनुनच शंतनु माझा शिवाजी साकार करू शकला 
कारण ते त्याचे आवडीचे काम होते ,
ज्यानी आत्महत्या केली ते सुटले या जाचातुन,,?
पण आजही उद्या जगण्या साठी आज मरत आहें त्या मुलांच काय?
नकळत पने आम्ही आमच्या मुलांचा बलिच घेत आहोत.
या धड्यातुन नेमका बोध नाही घेतला तर ,,,
"शिक्षणाच्या आयचा घो" म्हणायची पाली येणार नाही   

आपल्या सारखाच पालक 
सुनील भूमकर 

Wednesday, 6 January 2010

५ जानेवारी १५९२:-

५ जानेवारी १५९२:-
शहाजहान बादशहाचा जन्म.
ज्याने आपल्या आयुष्यात नेहमीच हिंदुंचा छळ केला,
आधीचीच सुंदर आणि रेखीव मंदीरे तोडली,,,
त्या शहाजहान बादशहाने "ताजमहाल" बांधला?
अशी धादांत खोटी माहिती आपण कॉंगेस सरकारच्या राज्यात शिकतो.
यावर प्रश्न असा आहे की, 
इस्लाममध्ये मूर्ती करायची नाही, 
चित्र काढायचे नाही, असे असताना
एक सार्वभौम बादशहा इस्लामला झुगारून ताजमहाल बांधतो?
आणि तत्कालीन मुल्ला काहि फ़तवा न काढता फ़क्त पहात रहातात?
हे हास्यास्पद नाही काय?
तसेच ज्या धर्मात केवळ कुराणाचीच शिकवण दिली जाते
त्या धर्मात वास्तुशास्त्रावर लेखन कुणी केले?
असाही प्रश्न या ढोंगी लोकांना पडला नाही.
ज्या मुमताजसाठी ती मेल्यावर ताज बांधला
त्या मुमताजसाठी ती जिवंत असताना
शहाजहानने किती महाल बांधले आणि ते कुठे आहेत?
हा साधा प्रश्न आपल्याला न पडत नाही,
तसेच ज्या शहाजहानचा ५००० स्त्रियांचा जनानखाना असताना
फ़क्त एका स्त्रीसाठी तो ताज बांधतो?
मग इतर जणींसाठी काय काय केले?
या प्रश्नांची उत्तरे शोधा मगच 
शहाजहानने ताज बांधला या अफ़वेवर विश्वास ठेवा.