तीर्थ मराठी ....
दयानीयांचा आदेश पचनी ना पडे..
ते खातील जोड़े याचीं देही ..
बहिनाच्या ओळी देतील तया शापं
जे करती पाप मराठी द्वेष..
तुकयाचे अभंग सागरी न बुडती,
घडे हे फक्त मराठीत ...
मराठी झाले बहु कायदे ,
मोडिले वायदे स्वार्था पोटी..
झालके सर्वत्र मराठीत पाटी,
उठे शूल पोटी अनेकांच्या ..
कुणी मागे माफी ,
कुणी घाली वाद ..
शेवटी प्रसाद कडू झाला
जया काढू वाटे मराठीची कळ
त्यानी काढावा पळ मायदेशी ..
करा नित्य प्राशन
मराठी हे तीर्थ ,,
जीवन हे अवघे तया विन व्यर्थ .
Thursday, 8 October 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment