Thursday, 8 October 2009

निष्ठेच्या इश्वराला दे निमत्रण....

||श्री नथू रामाय नमः ||
माझ्या प्रिय उमेदवारा ,,,


भाकर करपून गेली दुरडीतली ..
पण अश्रु येवू द्यायचा नाही .
उन्ह भांडली आयुष्याशी ,,
तरी मरण मागायच नाही.
झाड़ होवू पहाडावरच ,,
तावुन सुलाखून अनुभव घेवू .
रस्ता मोजुन प्रवासाचा,,
अंदाज करन सोडून देवू.
रावनाचे तोंड  घेवून ,,
भाषनाची स्पर्धा जिंकू नए कुणी.
बकासुराचे नाव घेवून,, 
अन्नग्रहन करू नए कुणी.
शिवरायाची पोथी वाचून,,
हिरव्या कविता लिहू नकोस.
अर्थाची संगती लावून ,,
आशयाला चाक लावू नकोस.
धीर धर गडबड़ीत ,,
बडबडीला फुटत नाहीत कोंब.
बी पेर मनात दाबुन ,,
मरणाशी ही जरा जोरात झोम्ब.
भाकर टुकडा खाता खाता ,,
इमानाचे भजन म्हन .
निष्ठेच्या इश्वराला दे निमत्रण 
बघ,,येतील तुझ्याकडे सर्वजण.
भीड़ असते भाड़खावु ,,
तिचा चेंदा मेंदा कर.
हाती हात घे धाड़साचा ठरवून ,,
मेंदू मात्र ठेव विस्तवावर धरून.... 


No comments: