Thursday, 11 February 2010

आता आपलं सरकार आलंय,,,,,

सगळं होणार, सगळं होणार, आता आपलं सरकार आलंय
सगळं होणार.... ।। धृ ।।
आता शेतमालाला बाजार मिळणार,
तुरडाळ १५० रु., तर साखर १०० रु. किलो होणार,
दलाल मालामाल अन् शेतकरी भुकेकंगाल होणार ।। धृ १।।
आता दोन्ही ऊर्जामंत्री निवडून आलेत
१० वर्षांत जे करता आले नाही ते वर्षांत करणार,
दिवसभर वीज जाणार, रात्रीचीच काही तासच रहाणार ।। धृ २।।
रस्त्याला आता हातभर खड्डे पडणार,
मतदारांचे मणके ढिले होणार,
ठेकेदारांचे मात्र खिसे भरणार ।। धृ ३।।
आता सर्वत्र मिरज घडणार,
गणेशमूर्ती फुटणार, शिवचरित्रावर बंधन येणार,
पोलिसांच्या गाडीवर हिरवा फडकणार ।। धृ ४।।
पोलिसांच्या परीक्षा अरबी-उर्दूतून,
इंग्रजी अंगणवाडीपासून,
आणि मायमराठी नष्ट होणार ।। धृ ५।।
तालुक्या तालुक्यात हज हाऊस होणार,
पंढरपूरच्या वारीवर बंधन येणार,
हजला अनुदान मिळणार ।। धृ ६।।
प्रज्ञासिंहला फाशी होणार, कसाब सरकारचा जावई होणार,
मुंबईत मेलेल्या अतिरेक्यांचे आता दर्गे होणार,
त्यावर शासन हिरवी चादर चढवणार अन् बाटगे तेथे उरुस साजरा करणार ।। धृ ७।।
सनातन वर बंदी येणार,
सिमीला अनुदान मिळणार,
अतिरेक्यांना पेन्शन मिळणार
पोलीस मात्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याला बळी पडणार ।। धृ ८।।
आता अतिरेक्यांनाच मुंबईवर हल्ला करण्याचे परवाने देणार,
सामान्य हिंदू किडामुंगीसारखी मरणार,
महाराष्ट्रासारख्या मोठ्या मोठ्या राज्यांत अशा छोट्या छोट्या गोष्टी नेहमीच घडणार ।। धृ ९।।
मराठी माणूस दिल्ली दरबारी स्वाभिमान गहाण टाकणार,
मुजरा करून सरदारक्या मिळवणार
अन् स्वाभिमानी शिवरायांना महाराष्ट्रापासून दूर सिंधू सागरात बसवणार ।। धृ १०।।
आता दहावी नापास अकरावीत जाणार,
बारावी नापास डॉक्टर, इंजिनीअर होणार,
माणसं मारणार, पूल कोसळणार ।। धृ ११।।
आता खून करणारे गृहमंत्री होणार,
हरणं मारणारे वनमंत्री होणार,
काहीच करणारा मुख्यमंत्री होणार
सगळं होणार, सगळं होणार,
आता आपलं सरकार आलंय, सगळं होणार ।। १२ ।।

1 comment:

सुनील प्रभाकर भूमकर said...

KIRAN VIVEK MUTHAL - ha post ekdum khatarnak aahe...
marathi madhalya Upahas ya alankaracha itaka changala upyog !!!!!!
farach chhan21:21