मंत्रालय आता चकाचक करणार म्हणे?
म्हणजे काय करणार?
नविन टाइल्स बसवणार?
कसल्याही टाइल्स लावल्या तरी ,,,,
सामान्य मानसाला मंत्रालयात घसरायला होतच
शिवाय नेते घसरतात ते वेगलेच...
मंत्रालय आता,,,,,,,
तिथे लिफ्ट ही बदलणार?
पण तिथे काहिनाच लिफ्ट मिळते
सामान्य माणुस नेहमीच क़तर में,,,?
सामान्य माणसाला अचूक ठिकाणी सोडनारी
लिफ्ट बसवली तर अधिक बरे,,,
मंत्रालय आता,,,,
छान छान दिवे ही लावणार म्हणे?
आता इतके दिवे लावले आहेत लोकशाहीचे
आणखी दिवे कशासाठी ?
मंत्रालय आता,,,
व्यवहार पारदर्शी होतील अशी काळजी घेणार?
म्हणजे फारतर दाराना काचा लावाल ,,!
एकदम पारदर्शी?
कारभार आणि काचाही,,,
मंत्रालय आता,,,
हवा खेळती राहिल अशी व्यवस्था करणार ,,,
पण इथे अनेक जान हवेत असल्या सारखे
वागतात त्यांचा काय?
मंत्रालय आता,,,,,,
अधिकार्यांचा आणि कर्मचार्यांचा कायम
सौजन्य सप्ताह असेल?
पण त्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी
टेबलावर सापडायला हवेत ना?
तसे ते सौजन्य मुर्तिच असतात
अडलेल्याना मदत करतात तेव्हा
मंत्रालय आता,,,
मंत्रालय पेपरलेस करणार म्हणे?
त्या ऐवजी पेपरवेटलेस केल तर
लोकांचे आशीर्वाद मिळतील
मंत्रालय आता,,,
स्वछता मोहिम राबवनार ,,,?
की पान, मावा खानार्यांवर बंदी घालून
मंत्रालय स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार?
मंत्रालय आता,,,,
सहावा मजल्याला ही वेगल रूप देणार ?
या मजल्याचे रूप आणि रंग
नेहमीच वेगले असतात
हे या मजल्याचे वेगले पण आहें
आणखी काय वेगले करणार?
मंत्रालय आता,,,,
असा म्हणतात की तिथे सिक्युरिटी वाढवनार ?
तिथे कायमच सिक्युरिटी जादा असते ?
एकदा का एखादा नेता तिथे जावून बसला
की
तिथे दूसरा येवून तिथे बसु नए म्हणून
पहिला दिल्ली पर्यंत सिक्युरिटी
टाइट करतो ,,,
मंत्रालय आता म्हणे चकाचक करणार?
No comments:
Post a Comment