||श्री नथू रामाय नमः||
वर्ष सरता सरता शेतकर्यांचा राजा ?
(आपले "शरद" आयत्यावेली "गारद" पवार साहेब हो असे गडबडून जावू नका)
अचानक बोलले "ग्लोबल वार्मिंग",,,,,,
आणि सारा महाराष्ट्र ( भारत देश हो,,,,,,)
त्या शब्दात बुडून गेला अगदी महापुर आला म्हणा ना!!
प्रत्येक माणुस उठतो आणि ग्लोबल वार्मिंग वर बोलू लागतो.
त्यांच्या खास विश्वासुसुसुसुसुसु कार्यकर्त्यानी
मुंबई पुण्याचे रस्ते
साहेबांच्या ग्लोबल वार्मिंग विचारांचे,,,?
ब्यानर तेही प्लास्टिक चे लावून झळकवाले
आणि ग्लोबल वार्मिंगला हात-भारच लावला.(काय बरोबर ना साहेब?)
खरतर पावसाल्यात या सर्व कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात
पण साहेब बोलले म्हणजे आपण आपली १\२ इंच छाती
बाहेर काढून बोलायला मोकले ,,(काय साहेब बरोबर ना?)
चला आता झाड़ वाचवा,,,
वाघ वाचवा ,,,,
पाणी वाचवा,,,
निसर्ग वाचवा ,,,
पर्यावरण रक्षण करा ,,,,
आणि ,,?
पृथ्वी वाचवा,,,?
खर तर हे सार ऐकून वाचून खुप हसू येत .
माणुस नावाचा हा प्राणी ५\६ फुटाचा
निसर्गाच्या समोर १\२ फुटाचा देखिल नाही
पण जो तो साहेबांच्या इशार्यावरआज
निसर्गाला वाचवायला निघाला आहें
स्वतः ला खुप मोठा हुशार (खर तर शहाणा )
समजू लागला आहें ....(काय साहेब बरोबर ना?)
प्रश्न खरा तर हा आहें हे सार वाचवायची ताकद मानवात आहें?
एव्हडया मोठया निसर्गाचा आम्हाला
ना आदि समजलाय
ना अंत ..
पण तरी सुध्हा हे वाचवा ते वाचवा
ही आपल्या कदाचि जुनी रित आहें
आधी रोग निर्माण करायचा मग,,
त्यावर औषध शोधायचे ,,
रोग होऊ नए याचीच काळजी मात्र घ्यायची नाही.
कशाला हे सारे प्रयत्न ?
नको विचार करू या पृथ्वीचा ग्लोबल वार्मिंगचा ,,,
तुला नाही झेपायचे,,
तुला फ़क्त घ्यायचे माहित आहें ,द्यायचे नाही
तुला ओरबडायच माहिती ,
खेचून घ्यायच माहिती.(काय साहेब बरोबर ना?)
अरे मग ओरबाड.... की ओरबाड...हवा तेव्हड़,,
नासव हव तेव्हड़ पाणी ,,,
पाणी संपल काळजी नको
आपल्याकडे वाइन आहें ना (बरोबर ना साहेब?)
तोड़ हवी तेव्हादी झाडे तोड़,,
जमीन मोकली कर,,
खर्या जंगलातून सिमेंटच्या जंगलात जा,,,
खान्या साठी मासे मार,,,,
वाघ मारून पर्स बनव,,,
हवी तेव्हडी हरण मार,अणि खा चवी चवीन,,,
कुठे ही प्लास्टिक फेक ,,कचरा टाक
सब भूमि तेरे बाप की (बरोबर ना साहेब?)
निसर्गाच काय बिघडनार आहें?
पृथ्वी च काय जाणार आहें?
अरे तुझ्या आधी ही पृथ्वी होती,
नंतर ही राहणार आहें ,
या अशा मानवाने उद्या स्वतः सकट सार्या
पृथ्वीचा सत्यानाश केला तरी काय बिघडणार आहें?
निसर्गाच काय जाणार आहें? पृथ्वी तरी सुध्हा सूर्य भोवती फिरतच राहिल निर्मनुष्य,,,,,,,,,,,,,,,
तिला कुठली आली आहें काळजी ?
हा मनुष्य नावाचा बुड बुडा राहिला काय आणि फुटला काय?
मग विश्वाची तर बातच सोडा ...
नष्ट होइल ती मानवजात ,,,
पर्यावरण वाचवायच्या गोष्टी कशाला राव?
हो जमलच तर स्वतः ला वाचव just save your self man
(बरोबर ना पवार साहेब?)