Sunday, 22 November 2009

वाघ पड़ला बावित अन् केलटया गांड दावी..

||नथू रामाय नमः ||
वाघ पड़ला बावित अन् केलटया गांड दावी..
मालवणी म्हन आहें ही ,,
याचा अर्थ असा की
वाघ बावित (विहिरीत)पड़ला की,
विहिरीच्या कठड्यावर बसून माकड सुध्हा
वाघला गांड दाखवून चिडवतात..
आज मराठीच्या वाघाची अवस्था 
काहीशी अशीच आहें
सारे मराठीचे मारेकरी
हिंदुत्वाचे मारेकरी,
शिखंडीच्या रुपात,
शिवसेनेला एकट खिंडित 
गाठायचा प्रयत्न करत आहेत,
आणि आज काहीही कारण नसताना
व्ही एच पि विश्व हिन्दू परिषदने अकारण
नव्या शिखंडी च्या आडून
सेनेवर शर संधान केले आहें.
की "बाला साहेब" 
अयोधेला आले नाहीत
मग आम्ही आलो ते कोण ?
आम्ही प्रति बाला साहेबच होतो की?
मनोहर जोशी कोण ?
प्रति बाला साहेबच की.
आणि महाराष्ट्रातुन आलेली 
तमाम जनता कोण?
प्रति बाला साहेबच की
आणि बाबरी पाडली गेल्यावर ती
जबदारी कुणी घेतली?
तुमचे स्वर्गस्थ पितर खाली आले होते का?
ज्यानी बाबरी पाडली त्यांचा 
मला अभिमान असा कोण म्हणाल?
हिंदुत्वाचा पुरस्कार खरा कुणी केला?
इथे महाराष्ट्रात त्यांच्याच मदतिनेच 
तर सत्ता उपभोगली ,,
तेव्हा नाही विचार केला?
तुमचे सारे तथाकतिथ फुढारी
सारेच तोंड लपवून बसले होते की ,,
बाबरी आम्ही पाडलीच नाही ,,
अस कोण म्हणाल?
बाबरी पाडल्याच खर दुख्ह कुणाला झाल?
लाल कृष्णा सकट, गुढ़ग्यात वाकलेले वाजपेइ 
आपल्या शब्दावर अटल राहिले का?
निदान पाकिस्तानात जावून
नादान लाल कृष्ण यांच्या सारखी  
जिनान्वर स्तुति सुमन तरी 
त्यानी उधळली नाहीत
२६\11 च्या हल्या नंतर ही  
तशीच वेळ आली तर ,,
अतिरेक्याना मी स्वता सोडायला 
गेलो असतो अस कोण म्हणले?.
जसवंत सिंग माहित आहेत ना?
मी स्वतः एक करसेवक(कारसेवक नव्हे)
आहें महिन्यताले १६\१७ दिवस मीदेखील 
त्यावेळी अयोध्येत काढले आहेत.
त्यावेळच्या सार्या सभा मी ऐकल्या आहेत
तुम्हा सकट सारेच ,,
रुतुम्भाराजी ,विनय कटियार,
आचार्य धर्मेन्द्र महाराज यांची भाषण 
ऐकली आहेत सेना प्रमुख 
आणि शिवसेना यांच्या उल्लेखा
शिवाय सभा पूर्ण होत नसत .
हिन्दू ह्रदय सम्राट म्हणून गौरवल्या 
शिवाय सभा पूर्ण होत नसत,,,
तेव्हा अशोक सिघल 
इतर पर प्रांतीय जसे वागतात  
तसे वागू नका 
आज एकेक करत सारेच 
सेना सोडून जात आहेत,
जानार्याला कुणी अडवू शकत नाही. 
यासंधी चा फायदा घेवुन 
आपल्याच मित्र पक्षावर 
वार करू नका ,
भाजपा(आयत्या वेळी 
बाहेर पडायाचा मार्ग म्हणजे भाजपा)  
वर तसा विश्वास नाहीच पण तुम्ही ही ?
आपण सार्यानी लक्षात घेतला पाहिजे 
हिंदुत्वाच्या नादात शिवसेनेने प्रसंगी 
मराठीलाही
डावलून आपणास साथ दिली आहें.
हे फळ काय मम तपाला अशी म्हणायची पाळी
सेनेवर आणू नका. यात फायदा कुणाचाच नाही 
हस मात्र सगल्यांचच  होतय .
मकड़ाना हसायला वाव देवू नका 
ही नम्र विनती 
कट्टर हिन्दुत्ववादी मराठी शिवसैनिक 
सुनील भूमकर 




No comments: