||श्री नथू रामाय नमः ||
तमसो मा ज्योतिर्गमय ....दिवाळी अंधारातून प्रकाशाकडे नेणारी
अंधारावर मात करणारी
रात्रीच्या अंधारातच प्रकाश दडलेला असतो तुम्ही तो
शोधायचा असतो हे सांगणारी दिवाळी ...
प्रत्येकाला दिवालीच अप्रुप असतच
मग तो गरीब असो वा श्रीमंत ..
कुणाची फटाक्यांची तर कुणाची फरालाची
नवीन कपड्यांची आताशा नविनमोबाइलची
पण धुंधी ही असतेच दिवाळीची ,
मग कुणी दिवाळीच्या शुभेच्छा पठवत
कुणी मेल करत
कुणी मीठाइ पाठवत
अनेक प्रकारे दिवाळी साजरी होते,
पण,,,
आनंदात सगळे भेद भाव विसरून सहभागी
व्हायचे असते तेव्हाच दिवाळी साजरी होते ,
असा म्हणतात ,
सण आणि ऊसव हे जिथे साजरे होतात,
तो समाज जीवंत आहें असे समजले जाते
पण आजच्या या यांत्रिक युगात आम्ही खरच जिवंत आहोत ?,,
जगातिकी करनाच्या जमान्यात
सीमा धूसर होत आहेत
आपली मानस दुरावतायतात
परस्पर संवाद कमी होत आहेत
दिवाळी हा एक आनंदोंस्तव आहें तो कोरड्या मनाने
कोरड्या शुभेछानी नाही साजरा होत .
दोन वा अनेक जणानी, मनानी, भावनाना
जोडणारे दुवे नाती याच खर्या शुभेच्छा असतात.
त्यांच्या गैर हजेरित हा सण
साजरा होऊ शकत नाही.
सकाळी पत्नीने,बहिणीने,आईने
हाका मारून ऊठवावे .
साखर झोपेतच उठवावे. आणि
सक्तीने अभ्यंग स्नान घालावे .
इतकी आपुलकी दिवाळीत असावी लागते.
ही आंघोळ साधी नसते .
तुमच्या आमच्या
नात्यावर साचलेला कडू मळ ही
आंघोळ काढत असते
भावा बहिणीच्या नात्याला घट्ट करत असते
नवरा बायको च्या नात्याला ,
आई मुलाच्या नात्याला ,
ही आंघोळ घट्ट करत असते
वासु बारस,नरक चतुर्थी ,लक्ष्मी पूजन आणि
भाऊबिज अर्थात यमद्वितीया साक्षात् यमाची बहिन
आपली असल्यावर आपल्याला
मृत्यचे भय ते काय ?
असाच ती सांगत असते
या सार्या मागे
घरातल्यांचे आर्शीवाद भावना यांचे बळ असते.
यासाठी श्रीमंतिची पैशाची गरज नसते ,
पाच पन्नास रुपयाचे कापड नवे कापड खरेदी करूनही
दिवाळी एवढ्या जोरात साजरी होते की ,,
लाखो रुपये खर्च करून सुध्हा
हा दिवाळीचा आनंद मिळत नाही
श्रीमंताना आनंद शोधावा लागतो
कुठे आणि किती खर्च
करून कोणती खरेदी करावी
यासाठी डोक चालवाव लागत.
आणि म्हनुनच,,
या सणाचा निर्भेळ आनद लुटन्यासाठी
सार्यानी ,,
एक दिवा ,,
उसाहाचा ,,
नाविन्याचा ,,
नात्याचा ,,
मैत्रीचा ,,
आपुलकीचा ,,
सामाजिक बंधिलकिचा,,
आणि
एकमेका वरील
विश्वासाचा दिवा लावला तर आपल्या खर्या
अर्थाने दिवाळी साजरी होइल यात शंका नाही.
कारण,,
हे सारे सण म्हणजे आपुलिकिचे कट्टे आहेत .
हे कट्टे मजबूत झाले की,,
जिव्हाल्याच्या बेटात रूपांतर
सहज शक्य होइल.
इथे मला ,,
चार्ली चाप्लीनचा लाइम लाइट ..नावाचा
एक सुंदर सिनेमा आठवतो ,,
त्यात त्याने,
रंग भुमिवरून बाहेर फेकल्या गेलेल्या
त्याच्या झगमगाटा दूर फेकल्या गेलेल्या
नटाची भूमिका केली आहें
त्यातील एक प्रसंग ,,,
हा नट जरी बाहेर फेकला गेला असला
तरी तो रोज थियेटर वर यायचा आणि तिथल्या
लोकांच्या रोज शिव्या प्रसंगी मारही खायचा
हे सर्व पाहून त्याच्या वर माया असणारी
प्रेम करणारी
नटी एक दिवस त्याला म्हणते
अरे रोज इथे येवून तू मार खातोस
लोकांची बोलनी खातोस
या सर्वांचा राग येत नाही घृणा वाटत नाही
का येतोस का इथे ?त्यावर ,,
चार्ली म्हणतो ,,
येतोना मलाही राग येतो
घृणा वाटते अग
त्या रस्त्यावर सांडलेल्या
माझ्या रक्ता कड़े
पाहून देखिल मला घृणा वाटते
पण काय करू ?
माझ्या नसा नसात तेच आहेना ?
मी कसा त्याचा राग राग करू
मी कसा त्याच्या पासून पलु ?
,,,,मला वाटत ,,
आपुलकीचे हे कट्टे असेच मजबूत झाले
तर आपल्याला सुध्हा आपल्यातील
असंख्य कुरबुरिंची घृणा येणार नाही राग येणार नाही
परस्परांवीशई आपुलकीचा दिवा असाच
निर्व्याज तेवत ठेवला तर ,,
रोजच दिवाळी..साजरी करता येइल
No comments:
Post a Comment