Tuesday, 22 September 2009

निवडनुकिचा हंगामच फक्त ,, बारमाही असतो ,,

||नथू रामाय नमः||
या देशात निवडनुकिचा हंगामच
फक्त ,,
बारमाही असतो ,,
नगरपालिके पासून 
लोकसभे पर्यंत मतदार मात्र ..
कायम रांगेतच उभा असतो.
...
आधुनिक राजे आणि 
त्यांचे निर्लज्ज सरदार 
यांच्या कात्रीत जनता झाली बेजार.
...
आणि म्हनुनच ,,
"गारुडी सापावर,,,
साधू तपावर ,,,,
व्यापारी मापावर,,,,
पोलिस भ्रष्टाचारावर ,,,
आणि पुढारी ,,,,थापंवर जगतात.
हो म्हणुन ,,
तत्वदयान काहीही असले तरी व्यवहार
वेगलाच असतो ,
दैनदिन जीवनात मतदाराला
लोकप्रतिनिधिचाच आधार असतो||१||
विमानात यांच्या कधी कधी मात्र 
चमत्कार घडतात ,
बेडीबंद आरोपी सहजच फिरत असतात.||२||
बिल्डर मालक जाल्यात सापड़ताच
थैलिची चक्र सुरु होतात,
बघता बघता राज्याचे रक्षक 
करोडोपति  होतात ||३||
लोकप्रतिनिधीच्या हद्दितच,
अवैध धंद्याचे जाले असते अनेक वेळा 
तक्रारी होत नाहीत उलट ते जाले 
अधिक घट्ट होत जाते ||४||
कायदा सुव्यवस्था राखताना सज्जन गरिबांचा
छल होतो आणि ,,
अनितिमान सत्ताधीश पैसेवाल्या 
उन्मत्त मुजोरांचा जय होतो ||५||    


No comments: