गो-ब्राम्हणप्रतिपालक
हिंदवीस्वराज्यसंस्थापक
क्षत्रियकुलावतं प्रौढप्रतापपुरंदर सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज महाराज
श्री शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय !!
राजे पुन्हा जन्माला या !! राजे पुन्हा जन्माला या !!
महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
महाराष्ट्र घडवाया ,जनतेला न्याय द्याया
राजे पुन्हा जन्माला या !!
धन्यधन्य जिजाऊ माता धन्य शहाजी महाराज
धन्यधन्य दादोजी कोंडदेव धन्य झाले ते मावळे
देऊन जयघोष हर हर महादेव मने अनेकांची जिंकिली
आई भवानीची कृपा तुम्हावर तलवार तुम्हासी दिधली
दिन-दुबळ्याची रक्षा कराया ,मावळे पुन्हा घडवाया
राजे पुन्हा जन्माला या !! राजे पुन्हा जन्माला या !!
हिन्दवी स्वराज्य स्थापन करून भगवा तुम्ही फडकवला
जयजय जयजय जय भवानी जयजय जयजय जय शिवाजी
हिन्दवी स्वराज्य स्थापन करून भगवा तुम्ही फडकवला
मुजरा मानाचा तुम्हाला राजे मुजरा मानाचा तुम्हाला
प्रेरणा तुमची आम्हाला राजे आशीर्वाद एक द्याया
राजे पुन्हा जन्माला या !!राजे पुन्हा जन्माला या !!
तव धैर्याचा हा अंश द्याया,तव शौर्याचा हा अंश द्याया
तव तेजाचा किरण द्याया,आयुष्यातील क्षण एक द्याया
राजे पुन्हा जन्माला या ....
Friday, 25 September 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment