साहेब एव्हड़ कराच ..
आज महाराष्ट्रात
निवडनुकांचा मौसम आला आहें.
आश्वासनांची खैरात सर्वच
राजकीय पक्ष करत आहेत.
कुनाचा
जाहिर नामा तर
कुणाचा वचन नामा
तुमचा पक्षाने अजुन
काहीच सांगितल नाही
आणि
म्हनुनच ही विनंती हाय
साहेब एव्हड कराच ....
कारण आपल्या सर्व सभानमधून ,,
श्री.राज शेखर रेड्डीन्चा उल्लेख करत आहात .
साहेब ,,
आपला जो काही जाहिर नामा वचन नामा
येइल त्यात आपण
मी ,,
"सीमा प्रश्न सोडावेंन त्यात भाग घेइल"
"त्यासाठी मी जिवाच रान करेन"
मग बघा अवघा महाराष्ट्र तुमच्या साठी जिव देइल
ही लोकप्रियता आपल्या दैवाताने अनुभवली आहें
आपनात ती ताकद तो करिश्मा आहें.
राजशेखर रेड्डीन्च्या तोडीस तोड़
आपणही ही लोकप्रियता मिळवाल
केवळ आपणास हे शक्य आहे.
बाकि सगलेच ,,
फुढारी ,,कर-नाटक ,कर-नाटक
असा खेल खेळत आहेत.
त्यांच्या एकाही जाहिर नाम्यात
सीमा प्रश्ना विषयी एक अवाक्षर नाही
का सीमा वासी मराठी नाहीत?
की केवळ ते तुमचे मतदार नाहीत
म्हणुन काही नाही ?
हे असल बेगडी प्रेम कोंग्रेस वालेच करू जाने
खरतर राज्य आल्यावर च नव्हे तर
राज्य जरी नाही आल तरी आम्ही ,,
सीमा प्रश्न सोडवू त्यासाठी लढा देवू ,
प्रसंगी तुरुंगात जावू,
(उपकार म्हणुन नव्हे,,
ह्या लढयाला आपापल्या पध्हतिने मदत करने
महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे हे काम आहें
अत्त्यंत सनदशिर मार्गाने हा लढा चालू आहें
गिनीज बुकात नाव जाव असा लढा आहें हा.)
पोतडी उघडली तर बरच काही ,,
पण वानगी दाखल काही अगदी ताज ,,
"२००९ येडीरुप्पा सरकारने मराठी भाषिकांच्या
नाकावर टिचुंन कर्नाटक सरकारने
विधान सभेचे अधिवेशन बेलगावात घेतले....
मराठयानी विरोध करताच,
लाठ्या काठ्या नी बडवले गेले...
तुरुंगात डामबले ,
अनन्वित अत्याचार केले...
खोट्या केसेस दाखल केल्या...
धरपकड़ केली..
काय नाही केले ?,,
आणि आम्ही,,?
हो आम्ही केले ना या गोष्टीचा निषेध
या पलिकडे काय करू शकतो ?
उद्धव साहेबानी लगोलग इशारा दिला ,,
"येडीरुप्पा याना महाराष्ट्रत
पावुल टाकू देणार नाही ,,
काय झाले ?
काही नाही.
(आणि त्याना तरी कुठे यायचे आहें महाराष्ट्रत ?)
आणि येतील तेव्हा परत,,
आम्ही करनारच की निषेध?
कमला बाइशि युति तोडू काय झाल?
बस झाल आता हे इशारे इशारे खेलन ,,
आता कृति हवी.....
बेलगाव, कारवार ,
धारवाड़, बीदर ,भालकी इत्यादी
मराठी मुल्खात कानडयानचे
अत्याचार चालतात
कानडी आली तर छोकरी तर नोकरी
एव्हडी वाइट अवसथा आहें गेली कित्येक वर्षे
तिथले मराठी महाराष्ट्रात येवू पाहत आहेत .
ते ही मराठीच आहेत .
महारष्ट्र एकीकरण समिति
मराठीच्या न्याय हक्का साठी लढतेय
कुणी आजन्म
लग्नच करनार नाही अशी शपथ घेतलीय ..
कुणी पायात चप्पल घालणार नाही..
कोण दाढ़ीच करणार नाही..
कुणी गोड खाणार नाही ..
एक ना अनेक तर्हेने ते
कानडी सरकारचा निषेध करत आहेत
लढा देत आहेत पण,
महाराष्ट्राने म्हणावी तशी साथ नाही दिली.
आज कर्नाटकात भा.ज.पा.चे सरकार आहें.
शिवसेनेच्या पाठिमब्यावर
महाराष्ट्र आणि केंद्र
दोहोत सत्तेचा वाटा भोगला
पण सीमा प्रश्नी मात्र हा प्रश्न
राष्ट्रपतीं च्या मदतीने हा प्रश्न सोडवावा
असा सल्ला भा.ज.पा. देते ,,,वा रे वा
या बदमाशिला तोड़ नाही .
राज साहेब मराठीच्या मुद्द्यावर एक आपणच
आहात जे ठाम मत मांडत आहात
राज साहेब पुन्हा एकदा विनंती आहें ,
तुम्ही या महाराष्ट्राचे ,,
"राजशेखर रेड्डी व्हा"
बेलगाव कारवार सह सारा सीमा प्रदेश
महाराष्ट्रत विलीन होइल अस पहा.
साहेब एव्हड कराच अहो असे १००
राजशेखर रेड्डी जरी खाली आले तरी ,,
तुमच्या गाठी जमालेल पुन्य हिरावून घेवू शकणार नाहीत .
एव्हड़ कराच आई भवानी आपणास उदंड आयुष्य देइल
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
lay bharri!!!!!!!!!!!!!!!!!!!!!jay shivaji,jay bhawani,jay maharashtra!!!!!!!!
Post a Comment