Saturday, 19 December 2009

कथा अरुणाची ,न्याय व्यवस्थेची आणि सोहनलाल वल्मिकिची ही ,,,,

कथा अरुणाची
न्याय व्यवस्थेची आणि सोहनलाल वल्मिकिची ही ,,,,,
मी त्यावेळी अगदीच लहान होतो म्हणजे ही घटना
घडली तेव्हा पण काही वर्षानी श्री विनय आपटे यानी ,,
"कथा अरुणाची"नावाचे सत्य घटनेवर आधारित नाटक
काढले होते
ते पाहिले आणि खुप चीड आली स्वतः चीच
सरकारच आणि ,,,
नराधम सोहनलाल वल्मिकिची ,
१९७३ साली सोहनलाल वाल्मीकि याने
अरुणा शानभाग वर बलात्कार केला
का?
तर त्याची त्याच्या गैर कारभाराची कम्प्लेंट तीने केली म्हणून?
केवळ २० वर्षाची ती
लग्नाचे स्वप्न उराशी घेवुन
ती
काम करत होती नुकतच तीच लग्न जमले होते
आणि या नाराधमा ने डाव साधला ,,,
प्रथम बलात्कार करून नंतर साखलिने तिचा गला दाबला
त्यामुले तिच्या मेंदूवर आघात झाला
आणि ती कोमात गेली आज तिला ३६वर्शे झाली
ती आजही  के इ एम रुग्नालयात औषध पचवत आहें
आणि सोहनलाल,,,,?
त्याच काय? इतक सगळ करून त्याच्यावर गुन्हा काय?
तर दरोडा आणि खुनाचा प्रयत्न?
केवळ ७ वर्षाची सजा भोगून हा पठ्या सुटलाही,,,?
आज तो कुठे तरी दिल्लीत
कुठल्याषा दवाखान्यात च आए म्हणे ,,
त्याच्यावरील आरोपत बलात्काराचा उल्लेखही नव्हता
या ३६ वर्षात १९७३ ते २००९
के इ एम चे ७ डीन बदलले
भोइवाड्याचे पोलिस बदलले,
अधिकारी बदलले,
नर्सेस बदलल्या
पण अरुनाला न्याय मिळाला नाही ,,,?का?
पण अरुनाचे काय?
तिला न्याय तर नाहीच नाही पण
त्या नाटकातील अरुनाला जसा दया मरण चा
न्याय मिलतो तसाच हिला ही मिळावा आणि ,,,
नाहीतर ,,,,
त्या सोहनलाल सकट सारेच जे या गोष्टिस कारनिभुत आहेत
 ते सारेच या सर्याना जबाबदार धरून जबर शिक्षा द्यावी
आता फ़क्त फाशी ने काम भागणार नाही याही पेक्षा
मोठी सजा द्यावी तरच अरुणा सुखाने जगेल (मरेल)
सुखांत .....होइल

मंत्रालय आता चकाचक करणार म्हणे?

मंत्रालय आता चकाचक करणार म्हणे?













मंत्रालय आता चकाचक करणार म्हणे?
म्हणजे काय करणार?
नविन टाइल्स बसवणार?
कसल्याही टाइल्स लावल्या तरी ,,,,
सामान्य मानसाला मंत्रालयात घसरायला होतच
शिवाय नेते घसरतात ते वेगलेच...
मंत्रालय आता,,,,,,,
तिथे लिफ्ट ही बदलणार?
पण तिथे काहिनाच लिफ्ट मिळते
सामान्य माणुस नेहमीच क़तर में,,,?
सामान्य माणसाला अचूक ठिकाणी सोडनारी
लिफ्ट बसवली तर अधिक बरे,,,
मंत्रालय आता,,,,
छान छान दिवे ही लावणार म्हणे?
आता इतके दिवे लावले आहेत लोकशाहीचे 
आणखी दिवे कशासाठी ?
मंत्रालय आता,,,
व्यवहार पारदर्शी होतील अशी काळजी घेणार?
म्हणजे फारतर दाराना काचा लावाल ,,!
एकदम पारदर्शी?
कारभार आणि काचाही,,,
मंत्रालय  आता,,,
हवा खेळती राहिल अशी व्यवस्था करणार ,,,
पण  इथे अनेक जान हवेत असल्या सारखे 
वागतात त्यांचा काय?
मंत्रालय आता,,,,,,
अधिकार्यांचा आणि कर्मचार्यांचा कायम 
सौजन्य सप्ताह असेल?
पण त्यासाठी कर्मचारी आणि अधिकारी 
टेबलावर सापडायला हवेत ना?
तसे  ते सौजन्य मुर्तिच असतात    
अडलेल्याना  मदत करतात तेव्हा   
मंत्रालय  आता,,,
मंत्रालय पेपरलेस  करणार म्हणे?
त्या ऐवजी  पेपरवेटलेस केल तर 
लोकांचे आशीर्वाद मिळतील 
मंत्रालय  आता,,,
स्वछता मोहिम राबवनार  ,,,?
की  पान, मावा  खानार्यांवर बंदी घालून 
मंत्रालय  स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार?
मंत्रालय आता,,,,
सहावा  मजल्याला ही वेगल रूप देणार ?
या मजल्याचे  रूप आणि रंग 
नेहमीच वेगले  असतात 
हे  या  मजल्याचे  वेगले पण आहें 
आणखी काय वेगले करणार?
मंत्रालय आता,,,,
असा  म्हणतात की  तिथे सिक्युरिटी  वाढवनार ?
तिथे  कायमच सिक्युरिटी जादा असते  ?
एकदा  का एखादा  नेता  तिथे जावून  बसला  
की 
तिथे दूसरा  येवून तिथे बसु  नए  म्हणून 
पहिला  दिल्ली  पर्यंत  सिक्युरिटी  
टाइट   करतो ,,,
मंत्रालय आता म्हणे चकाचक करणार?