Wednesday, 14 October 2009

देशामधील एकमेव राज्य जिथे बिगर स्थानीयभाषिक व्यक्ती मंत्री होऊ शकते - महाराष्ट्र


मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, 
6 खासदार लोकसभेमधे पाठवते, 
परंतु निवडणूक लढवणारे 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना व्यतिरिक्त 
सर्वपक्षीयउमेदवार हे बिगर मराठी, 
अपवाद फक्त 
एकनाथगायकवाड (कॉंग्रेस).
इतर कोणत्याही पक्षाला 
मराठी उमेदवार मिळाले नाहीत.? 
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीकार्यकर्त्यानी त्यांचा 
पारंपरिक मतदारास
(उत्तरभारतीय घूसखोर जनतेस) 
मुंबई मधे थोपवूनठेवले आहे. 
मतदान करा आणि मग उन्हाळीसुट्टीसाठी 
गावाला जावे असा इशारा दिला आहे.
अशा सर्व मराठी विरोधी परिस्थितीमधे 
आपणमराठी माणूस काय करणार?
मतदान न करता 
त्यादिवशी मौजमजा 
करणारआणि,, 
बिगर मराठी उमेदवार 
नीवडून आल्यावर
त्याच्या नावाने 
शिव्या घालत पुढील दोन दीवस
भांडत बसणार. 
इतकी वर्ष ज्या 
चुका करत आलो निदान 
ह्यावेळीतरी सुधारणा करू.   
पक्षीय मतभेद विसरून 
आणि 
मोठ्या संखेने मतदान करून,   
जास्तीतजास्त मराठी 
उमेदवार निवडून आणू 
आणि 
मुंबई मधील मराठी 
ताकद देशाला दाखवून देऊ.
जरा इथे लक्ष द्या - 
01.  
रजनीकांत,
तमिळ चित्रपटचा बादशाह,
केवळ जन्माने तमिळ नाही 
म्हणून 
त्याला तामीळनाडू मधून 
निवडणूक लाढवता येत नाहीय. 
02.  
पर-राज्यात 
स्थलांतरीत झालेल्या 
उत्तरभारतीयांच्या 
कथित समस्या सोडवण्यासाठी,
पक्षीय मतभेद विसरून 
सर्व उत्तरभारतीय नेते 
एकत्रयेतात, 
आणि,, 
आमचे मराठी नेते,,? 
एकमेकांच्या 
कमरेतलाथा घालून 
उत्तरभारतीयांच्या 
दाढया कुरवाळण्यात 
धन्यता मानत आहेत. 
03.  
देशामधील एकमेव राज्य 
जिथे बिगर स्थानीयभाषिक 
व्यक्ती मंत्री होऊ शकते - महाराष्ट्र 
04.  
देशामधील एकमेव शहर 
ज्याचा उप महापौर हा बिगर 
स्थानीय भाषिक व्यक्ती - मुंबई 
05.  2004 
च्या विधानसभा 
विश्लेषण निदर्शनास आणून देते की,, 
मुंबई - पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रमधील,,
48 मतदारसंघांवर् बिगर मराठी भाषिक मतदारांचाप्रभाव आहे, ,
आणि 2014 नंतर तिथून 
मराठी उमेदवार 
निवडून येणे कठीण आहे, 
ज्यामुळेमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा 
बिगर मराठी असेल.
मराठी असल्याचा अभिमान असेल, 




Tuesday, 13 October 2009

चिमन रावांच स्वप्न ,,

चिमन रावांच स्वप्न ,, 
(बाळासाहेब आपल्या सिंहासनावर विराजमान होऊन बसले आहेत… 
उद्धव दाराच्या कोप-यात उभे आहेत... राज ठाकरे दुस-या बाजूला डोक्याला हात लावून उभे आहेत...)
बाळराजे –  काकाश्री आपण आम्हाला थेट मातोश्रीवर कशासाठी पाचारण केलंत?  निवडणुकीच्या मोहिमेपूर्वी   
आम्ही मातोश्रीवर तशरीफ ठेवली होती हे जर आमच्या मावळ्यांना..(जीभ चावत) मनसैनिकांना  
समजलं तर गहजब होईल... आपणाला याची कल्पना आहे ना काकाश्री?
         

काकाश्री 
–  बाळराजे आपण इतकी घाईगडबड करू नका... शांत व्हा...
 मला आपल्याशी एका महत्वाच्या
 
मोहिमेविषयीच बोलायचं आहे. म्हणूनच तुम्हाला मातोश्रीवर बोलावणं केलं आम्ही...
बाळराजे
 – आज्ञा काकाश्री.. पण जरा लवकर ... 
राजगडावर शिलेदार आमच्या वाटेकडे डोळे लावून उभे
आहेत. (प्रचाराच्या) मोहिमेची तयारी झालीय. आता निघण्याची वेळ झालीय.
        

काकाश्री
 – (भावनावश होत...) हो..हो... किती घाई करता बाळराजे...
किती बदलला आहात तुम्ही? आता
आमच्यापेक्षा तुम्हाला तुमच्या मनसैनिकांची जास्त चिंता वाटते? 
बाळराजे
 – (डोळ्याला रूमाल लावत) 
आम्हाला त्यांनीच हात दिला काकाश्री...आणि तुम्ही....
तुम्ही हात  दाखवलात...आता तेच आमच्यासाठी सगळं काही...
काकाश्री
 – बाळराजे....बाळराजे 
आम्हास वाटतं की तुम्ही आणि दादाराजेंनी पुन्हा गुण्यागोविंदानं एकत्र
 
राज्य...म्हणजे राजकारण करावं... आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा मुलुख जिंकावा आणि मराठी
 
जनतेचीही तीच इच्छा आहे...
        

बाळराजे
 – (तारस्वरात) ही इच्छावजा आयडिया 
आपणाला जोशी सरांनी तर दिली नाही ना? 
कारण त्यांना
वा-याची दिशा लवकर कळते... असं मीडियावाले म्हणतात. त्यांनीच ही आयडिया परवा एका
कार्यक्रमात बोलून दाखवली म्हणे... आमची पोहोच लवकरच कोटीच्या घरात जाणार हे त्यांनी
जाणलं असावं... या मोहिमेत काही कोटी मतं नक्कीच घेऊ…. 
raj cartoon long.JPG
काकाश्री
 – बाळराजे...आपण मराठी जनतेच्या हितासाठी तरी दादाराजेंना साथ द्यावी... 
असं मराठी जनतेला वाटतं...
बाळराजे
 – मग त्यासाठी आम्ही विलीन का व्हावं? 
दादाराजेंनी आम्हाला साथ द्यावी हवी तर... तसेही ते
पुढे गाताना नाही तर मागे साथ देतानाच छान दिसतात...
अर्थात मीडियावाले म्हणतात 
काकाश्री
 – पण, बाळराजे...
दादाराजे
 – (बाळासाहेबांना थांबवत..आणि आपलं मौन तोडत) पाहा साहेब... 
मी म्हटलं नव्हतं, बाळराजे 
आपला हट्ट सोडणार नाहीत म्हणून...
बाळराजे
 – आमचा कसला हट्ट?  
आम्ही बाजूला झालोम्हणूनच तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची संधी
मिळाली...आता आम्ही बाहेर पडून आमचं बस्तान बसवलंय. 
आमची रेल्वे आम्ही स्वत: तयार केलेल्या रूळावर धावते...
पुण्याईवर नाही...
दादाराजे
 – पाहा साहेब... 
बाळराजे आताही आम्हाला टोमणेच मारत आहेत...
परवा युवराज आदित्यलाही त्यांनी भर पत्रकार परिषदेत मिरच्यांची धुरी दिली....
काकाश्री
 –  बाळराजे आवरा स्वत:ला...किमान मराठी माणसासाठी तरी...
बाळराजे
 -  आता कसलं आवरायला सांगता आहात काकाश्री... 
आपण आधीच दोर घट्ट धरले असतेत तर
ही वेळ नसती आली काकाश्री
काकाश्री – बाळराजे आता मेलेली मडी उकरून काय फायदा ?
ऐका आमचं...दादाराजेंच्या खांद्याला खांदा
लावून काम करा... निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धडा शिकवा...
विधानसभेवर भगवा फडकवा...

BALASAHEB_UDHAV.JPG
दादाराजे – हो... हो... आम्ही मुंबापुरी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या 
मुलखावर बारीक नजर ठेवतो.
आणि आपण विदर्भ आणि कोकणावर पकड मजबूत करा... 
मग पाहा काय चमत्कार होतो ते...
बाळराजे
 – हीच तर तुमची खोड आहे दादाराजे...
नेहमीच तुम्ही आमच्या वाट्याला काटे दिले आणि आपण
फुलांच्या झोक्यावर झुलत राहिलात...
दादाराजे
 – मी म्हटलं नव्हतं साहेब.. 
बाळराजे कधीच हेका सोडणार नाहीत... त्यांनी मागच्या मोहिमेतही
आम्हाला मान खाली घालायला लावली... सवयीप्रमाणे
बाळराजे
 – (कुत्सित हसत...)  हमममम...
दादाराजे
 – साहेब, बाळराजेंना आवरा...
काकाश्री
 – (अंमळ रागानं )बाळराजे आणि दादाराजे 
आपल्यायाच गृहकलहामुळे आमची मेहनत आणि
मशागत फुकट जातेय....समजलं ? 
आता तुम्हा दोघांसाठी आमचा आदेश (बांदेकर) आहे...
आजपासून या क्षणापासून आपण मराठी माणसासाठी एकत्र येऊन काम करावं... 
त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल... 
आमच्यासाठी एव्हढं करा...अवघ्या महाराष्ट्राची इच्छा आहे.
बाळराजे आणि दादाराजे – (एकमेकांकडे न पाहता... थोड्याविचारानंतर) 
आपली आज्ञा शिरसावंद्य...
आम्ही आजपासून एकत्र काम करू... पाहाच दिवाळीनंतर  
विधानसभेवर भगवा फडकत असेल....
चिमणराव – 
(दचकून उठत... घडाळ्यात पाहतात... चक्क सकाळचे साडेनऊ वाजलेले असतात. 
इतकं गोड स्वप्नं पडलं होतं की सातचा गजर वाजून वाजून बंद झाला तरी ऐकू आला नाही 
म्हणत बाथरूमकडे जातात.) 
बायकोला उद्देशून- हाक नाही का मारता येत? आता मला नऊ छप्पनची
लोकल कशी मिळणार ? 
पार्वतीबाई
 -  (चहाचं आदण ठेवतात खलबत्त्यात आलंटाकताना) 
छप्पनदा आवाज दिला पण ऐकू येईल तर शपथ 
तुम्हाला...दिवसा कसली स्वप्नं पाहतात कुणास ठाऊक...? 
चिमणराव
 – (स्वतःशीच म्हणतात... 
डोक्यातून दोन आवाज जात नाहीएत 
एक खलबत्याचा आणि 
दुसरा ,,,,,
मराठी माणसा जागा हो या घोषणेचा)





Thursday, 8 October 2009

तीर्थ मराठी ...

तीर्थ मराठी ....
दयानीयांचा आदेश पचनी ना पडे..
ते खातील जोड़े याचीं देही ..
बहिनाच्या ओळी देतील तया शापं
जे करती पाप मराठी द्वेष..
तुकयाचे अभंग सागरी न बुडती,
घडे हे फक्त मराठीत ...
मराठी झाले बहु कायदे ,
मोडिले वायदे स्वार्था पोटी..
झालके सर्वत्र मराठीत पाटी,
उठे शूल  पोटी अनेकांच्या ..
कुणी मागे माफी ,
कुणी घाली वाद ..
शेवटी प्रसाद कडू झाला
जया   काढू वाटे मराठीची कळ
त्यानी काढावा पळ मायदेशी ..
करा नित्य प्राशन
मराठी हे तीर्थ ,,
जीवन हे अवघे तया विन व्यर्थ . 

      

निष्ठेच्या इश्वराला दे निमत्रण....

||श्री नथू रामाय नमः ||
माझ्या प्रिय उमेदवारा ,,,


भाकर करपून गेली दुरडीतली ..
पण अश्रु येवू द्यायचा नाही .
उन्ह भांडली आयुष्याशी ,,
तरी मरण मागायच नाही.
झाड़ होवू पहाडावरच ,,
तावुन सुलाखून अनुभव घेवू .
रस्ता मोजुन प्रवासाचा,,
अंदाज करन सोडून देवू.
रावनाचे तोंड  घेवून ,,
भाषनाची स्पर्धा जिंकू नए कुणी.
बकासुराचे नाव घेवून,, 
अन्नग्रहन करू नए कुणी.
शिवरायाची पोथी वाचून,,
हिरव्या कविता लिहू नकोस.
अर्थाची संगती लावून ,,
आशयाला चाक लावू नकोस.
धीर धर गडबड़ीत ,,
बडबडीला फुटत नाहीत कोंब.
बी पेर मनात दाबुन ,,
मरणाशी ही जरा जोरात झोम्ब.
भाकर टुकडा खाता खाता ,,
इमानाचे भजन म्हन .
निष्ठेच्या इश्वराला दे निमत्रण 
बघ,,येतील तुझ्याकडे सर्वजण.
भीड़ असते भाड़खावु ,,
तिचा चेंदा मेंदा कर.
हाती हात घे धाड़साचा ठरवून ,,
मेंदू मात्र ठेव विस्तवावर धरून.... 


Wednesday, 7 October 2009

अवो नावात काय हाय?

आ.मा श्री .संजीव पेंढारकर
विको लेब्स 
अरे सॉरी ह मी चुकून आपले नाव लिहिले
माफ करा खर तर नाव किवा पत्ता न टाकताच
हा मेल किवा पत्र मीलु शकतो हे मझ्या
ध्यानातच नाही आल 
आजच आपला लेख वाचला
सकाळ ७.१०.९ "नावात काय आहें?"
आन आमी आपले येडे आपल्या 
सारख्या मोठया ठ्या ठ्या ठ्या,,,,,,,,,
सायंबास्नी हे 
पत्तुर बिना नावा गावच मिळल ,
ह्यो इचारच आमच्या टाकूर्यात न्हाइ आला.
तवा एक डाव आम्हास्नी माफी करा 
आवो तुमचा इचार,,
त्यों न्हैका ?
"नावात काय आहें चा "
आमच्या टाकूर्यात न्हाइ शिरत 
पण तवा,,  
सकाळ पास्न आमी ठरिवलय
आता आमी बी आमच्या 
बापच नाव लिवनार न्हाइ
अवो नावात काय हाय?
आमच्या पोरा टोरास्नी बी सांगणार हाय ,
खबरदार,, 
आमच नाव तुमच्या नावा 
म्होर लिवायच न्हाइ 
अवो नावात काय हाय?
आमच्या बायकोला  सांगणार हाइ ,,
मह्या नावाच कुकू लावयाच न्हाइ ,,
अवो नावात काय हाय?
अशी ही लीश्ट सायेब लइ वाडल बगा
थोडक्यात गमत सांगतो राव ,,
बा ,संजीवा कान दिवुन ऐक,,
तुम्हास्नी पड़लेला प्रश्न,, 
ह्या महाराष्ट्रातल्या 
एका मंत्र्यास्नी बी पडला हुता 
आता बगा झाली असतील४०\५० वर्स
यसवंत राव चव्हाण की काय नु त्यां नाव हुत.
त्याना बी असाच प्रस्न पड़ला हुता ,
अवो त्यों,, 
आचार्य अत्रे की काय नाव हुत त्यांच.
त्यों बी असाच वरडायचा ,,
"बेलगाव कारवार सह सारा सीमा प्रदेश 
महाराष्ट्रात विलीन झालाच पाहिजे"
त्यावर त्यों बाबा अवो त्यों 
यशवंत राव चव्हाण त्यों म्हणला ,
"अत्रे साहेब सीमा प्रदेश,,, 
महाराष्ट्रात विलीन झाला पाहिजे" 
ह्ये बरुबर हाय 
पण झालाच पायजे ह्या "च"वर 
एव्हाडा जोर का ?
अवो तेव्ह्डा त्यों "च"काढला 
तर न्हाइ का जमणार ?
त्यावर अत्रे सायेब गरजले 
आक्षी सिव्हा वाणी 
चव्हाण सायेब  
आमी आमचा "च"माग घ्याया तयार हाय.
फकस्त एक काम करा ,,
तुमच्या नावातील "तेव्ह्डा "च"काढा
तुमाला बी "च"ची कीमत कळल 
आन "च" काढल्यावर काय उरत 
त्ये आमास्नी कळवा.
आन तुमि तर आमास्नी नावात काय 
म्हणून इचारता
आवो आमस्नी तर नावा बिगर,, 
काय बी मोठठठ,,न्है दिसत 
इथाला इतिहास तपासला तर लक्ष्यात इल 
नावा साठी तर इथ संमद्या लढाया झाल्या 
कितेकानी प्राण दिले 
कित्येकानी प्राण घेतले 
आणि हो 
आम्ही नतद्रष्ट 
छत्रपतिंचे राजेपन आम्हीच नकारल 
म्हणुन तर त्याना ,,
"मी राजा आहें हे सांगाव लागल "
राज्याला राजधानिला नाव द्याव लागल.
तेव्हा संजीव पेंढारकर नावात काय आहें 
हे निदान तुम्ही तरी बोलू नका 
इतकी वर्षे चाललेली तुमची विको तीच नाव बदला 
किवा काढून टाका बघा काय गमत होते